"कोन्स्टान्स सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ४०:
 
== प्रदूषण नियंत्रण ==
दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात औद्योगिक प्रगतीमुळे सरोवराच्या प्रदूषण पातळीमध्ये खूप वाढ झाली. १९७०च्या१९७० च्या दशकामध्ये साधारणपणे १९७६-७७ मध्ये याच्या प्रदूषणाने उच्च पातळी गाठली. याच्या प्रदूषणाचा मुख्य परिणाम सरोवरातिल मच्छिमारीवर झाला. अनेक माशांच्या प्रजाती ज्या एकेकाळी मोठ्या प्रमाणावर सरोवरात होत्या त्याची संख्या लक्षणीयरित्या रोडावली. तसेच या काळात जर्मनीतील अनेक नद्यादेखील अतिप्रदूषणामुळे ग्रासलेल्या होत्या. यानंतरच्या काळात नद्या, तळी व सरोवरे शुद्धीकरणासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सरोवराकाठच्या सर्व शहरे व गांवामधील सांडपाणी सरोवरात तसेच सरोवरात येउन मिळणाऱ्या लहान नदी नाल्यांमध्ये सोडण्यावर अंत्यंत कडक निर्बंध लादण्यात आले. या निर्बंधात ऱ्हाइन नदीच्या वरच्या भागातील शहरे व गावे सुद्धा समाविष्ट करण्यात आली. या साठी ऑस्ट्रिया, इटली व स्विझर्लंड याचे आंतराष्ट्रिय सहकार्य घेण्यात आले. सरोवरात पोहण्यावर बंदी घालण्यात आली. सरोवराकाठच्या रस्त्यांची पुनर्रचना करण्यात आली. सरोवरकाठाला काही ठिकाणी संरक्षित अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. सरोवरच्या जवळील क्षेत्रातील शेतीवर देखील रासायनिक खते वापरण्यावर निर्बंध आहेत. यासाठी येथील सरकार शेतकऱ्यांना याची नुकसान भरपाई देते.
 
परिणामी हळूहळू प्रदूषण पातळी कमी होऊ लागली. अनेक माशांच्या दुर्मिळ प्रजाती पुन्हा मोठ्या संख्येने सरोवरात मिळू लागल्या. साधारणपणे १९९० नंतर प्रदूषण पातळी ही स्थिर आहे. आज हे सरोवर पूर्णतः प्रदूषणमुक्त नसले तरी पातळी प्रदूषण न जाणवण्या इतपत कमी करण्यात यश आलेले आहे. या सरोवराचे प्रदूषण मुक्तिकरण मोहिम ही आज जगातील इतर देशातील सरोवर व तळ्यांसाठी मापदंड ठरली आहे.