"निकिता ख्रुश्चेव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ३२:
'''निकिता ख्रुश्चेव्ह''' ({{lang-ru|Никита Сергеевич Хрущёв}}; १५ एप्रिल १८९४ - ११ सप्टेंबर १९७१) हा एक [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत]] राजकारणी व सप्टेंबर १९५३ ते ऑक्टोबर १९६४ दरम्यान देशाचा राष्ट्रप्रमुख तसेच [[सोव्हिएत संघाचा कम्युनिस्ट पक्ष|सोव्हिएत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा]] सरचिटणीस होता. [[जोसेफ स्टॅलिन]]च्या मृत्यूनंतर ख्रुश्चेव्हने सोव्हिएतचे नेतृत्व केले व देशामध्ये स्टॅलिनची धोरणे बदलण्याचे कार्य मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. १९५८ ते १९६४ दरम्यान ख्रुश्चेव्ह सोव्हिएत मंत्रीमंडळाच्या अध्यक्षपदावर होता.
 
ख्रुश्चेव्हचा जन्म [[रशिया]] व [[युक्रेन]]च्या सीमेजवळील एका लहान गावामध्ये झाला. तरूण वयामध्ये तो एक कुशल लोहार होता. [[रशियन यादवी युद्ध]]ानंतर ख्रुश्चेव्ह राजकारणात शिरला व हळूहळू कम्युनिस्ट पक्षामध्ये वरच्या पदांवर पोचू लागला. १९३०च्या१९३० च्या दशकातील स्टॅलिनने हाती घेतलेल्या राजकीय अटकांना व हिंसाचाराला ख्रुश्चेव्हचा पाठिंबा होता. १९३९ साली स्टॅलिनने ख्रुश्चेव्हला [[युक्रेनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य|युक्रेनमधील]] सत्ता सांभाळण्यासाठी पाठवले. [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[लाल सैन्य]]ाचे नेतृत्व करणाऱ्या ख्रुश्चेव्हकडे [[क्यीव]]वरील [[नाझी जर्मनी]]चे आक्रमण थोपवून धरण्याची जबाबदारी होती. १९४२ साली स्टॅलिनने ख्रुश्चेव्हला [[स्टालिनग्राड]] शहराच्या [[स्टालिनग्राडची लढाई|बचावासाठी]] रवाना केले. युद्ध संपल्यानंतर ख्रुश्चेव्ह पुन्हा युक्रेनमध्ये परतला व त्याच्या नेतृत्वाखाली युक्रेन सोसागमध्ये पुन्हा शांतीचे व भरभराटीचे दिवस परतले. स्टॅलिनच्या अखेरच्या काळात ख्रुश्चेव्ह [[मॉस्को]]मध्ये दाखल झाला. ६ मार्च १९५३ रोजी स्टॅलिनच्या मृत्यूनंतर सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणासाठी अनेक नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली ज्यामध्ये ख्रुश्चेव्हचा विजय झाला व तो पक्षाचा सरचिटणीस व पर्यायाने देशाचा राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुख बनला.
 
ख्रुश्चेव्हच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत संघाने मोठ्या प्रमाणावर [[अंतराळ संशोधन]] हाती घेतले व लष्करावरील खर्चात कपात केली. ख्रुश्चेव्हने कृषी क्षेत्रामध्ये अनेक प्रयोग केले परंतु जे अयशस्वी ठरले. त्याच्या कारकिर्दीमध्ये [[शीत युद्ध]] शिगेला पोचले. [[क्युबन क्षेपणास्त्र आणीबाणी]]दरम्यान सोव्हिएत व [[अमेरिका|अमेरिकेमध्ये]] प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. १४ ऑक्टोबर १९६४ रोजी कम्युनिस्ट पक्षाने ख्रुश्चेव्हला सरचिटणीस पदावरून काढले व त्याला राजकीय निवृत्ती स्वीकारण्यास भाग पाडले. अखेरच्या काळात ख्रुश्चेव्हचे दिवस मानसिक नैराश्यामध्ये गेले व ११ सप्टेंबर १९७१ रोजी तो मॉस्कोमधील एका इस्पितळामध्ये [[हृदयाघात]]ाच्या धक्क्याने मृत्यू पावला.