"झुल्फिकार अली भुट्टो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ८:
== राजकारण ==
पाकिस्तानात त्यांची ओळख राजकारणी वर्तुळाशी झाली. उच्चशिक्षित असल्याने बुद्धिवादी वर्गासोबतही त्यांची उठबस होती. १९५७ साली त्यांना
संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. येथुन राजकारणातल्या पायऱ्या भुट्टो वेगाने चढले. पाकिस्तान लष्करशहा अयुब खान यांची सत्ता आली होती. त्यांच्या सरकारात भुट्टोंना मंत्री पद मिळाले. अयुब खानांची मर्जी त्यांनी लवकर संपादन केली. १९६२ साली त्यांना परराष्ट्रमंत्री पदी बढती मिळाली. सुरवतीला त्यांनी पाकिस्तानला अमेरिकेच्या प्रभावातुन दुर ठेवण्याची भुमिका घेतली. १९६२च्या१९६२ च्या भारत - चीन युद्धात अमेरिकेने भारताला मदत केल्याबद्दल त्यांनी अमेरिकेवर टिका केली. यांनंतर त्यांनी चीन शी मैत्रीपूर्ण संबंध वाढवण्याची भुमिका घेतली. अयुब खानंच्या सोबत चीन दौऱ्यावर असतांना त्यांनी सैनिकी मदत मिळावणारे करार केले. तशात १९६३ साली त्यांनी चीन सोबत सीमा करार करतांना ७५० चौ. कि मीचा पाकव्याप्त काश्मीरचा प्रदेश चीनच्या ताब्यात दिला.
=== पंतप्रधान पद ===
इ.स. १९७१ साली [[भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध|बांगला मुक्तिसंग्रामात]] पाकिस्तानी सैन्याचा पराभव झाला. अश्या आव्हानात्मक कालखंडात झुल्फिकार अली भुट्टोंनी पाकिस्तानाच्या पंतप्रधानपदाची सूत्रे ताब्यात घेतली. लगोलग भारतासोबत शिमला करार करत, पराभूत राष्ट्र असूनही पाकिस्तानाला सोयीचा ठरणारा करार केल्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढली. इ.स. १९७४ सालातल्या भारताच्या अणुचाचण्यांनंतर त्यांनी पाकिस्तानाच्या अणुकार्यक्रमाची घोषणा करत, इस्लामी देशांना लक्षून ''इस्लामी बॉंब'' या संकल्पना मांडली. याच इस्लामी बॉंबनिर्मितीसाठी त्यांनी [[लिबिया]] व [[सौदी अरेबिया]] इत्यादी देशांकडून बरेच अर्थसहाय्य मिळवले व आवश्यक तंत्रज्ञान कमवण्यासाठी विद्यार्थी परदेशी शिक्षणास पाठवले {{संदर्भ}}.