"झलकारीबाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Jhalkaribai_Statue_at_Gwalior.jpg|इवलेसे|right|झलकारीबाईंचा ग्वाल्हेर येथील पुतळा]]
'''झलकारीबाई''' (२२ नोव्हेंबर १८३० - १८५८) ही एक स्त्री लढवय्यी होती, जिने [[१८५७चे१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७च्या१८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात]] एक महत्त्वाची भूमिका बजावली. तिने [[राणी लक्ष्मीबाई|झाशीची राणी लक्ष्मीबाई]] हिच्या स्त्री लष्करात काम केले. हिचा जन्म [[कोळी समाज|कोळी समाजात]] झाला.<ref name="Dinkar">{{स्रोत पुस्तक|last1=Dinkar|first1=D C|title=Swatantrata Sangram Mein Achuto Ka Yogdan|date=14 April 2007|publisher=Gautam Book Center|location=Delhi|isbn=81-87733-72-1|pages=40}}</ref> पुढे ती झाशीची राणी लक्ष्मीबाईची एक प्रमुख सल्लागार बनली.<ref name="Sarala">{{harvnb|Sarala|1999|pages=112–113}}</ref> झाशीच्या किल्ल्याचे युद्ध पेटलेले असताना, ती स्वतः राणी म्हणून गादीवर बसली आणि राणीच्या बाजूने आघाडीवर लढली, त्यामुळे राणीला किल्ल्यातून पळून जाणे शक्य झाले.<ref name="Varma1951">Varma, B. L. (1951), ''Jhansi Ki Rani'', p. 255, as quoted in {{harvnb|Badri Narayan|2006|pages=119–120}}</ref>
 
झलकारीबाई संबंधातील कथा कित्येक शतके [[बुंदेलखंड|बुंदेलखंडातील]] लोकांच्या स्मरणात आहेत. तिचे आयुष्य, खास करून राणीला वाचवण्यासाठी [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीच्या]] सेनेशी लढतानाचे तिचे धैर्य, याची [[बुंदेली भाषा|बुंदेली]] लोकसाहित्यात आजही स्तुती केली जाते. तिचे शौर्य आणि तिची कोळी ही ओळख यामुळे उत्तर भारतातील शाक्यांमधे स्वाभिमान आणि सांस्कृतिक ऐक्याची भावना निर्माण होण्यास मदत झाली.<ref>{{harvtxt|Badri Narayan|2006|page=119}} प्रमाणे "आज, कोळी इतर दलित जातींप्रमाणे, झलकारीबाईचे मिथक स्वतःच्या समाजाचा गौरव करण्यासाठी वापरतात. ते दरवर्षी “झलकारीबाई जयंती सुद्धा साजरी करतात जेणेकरून त्यांचा आत्मसन्मान आणि त्यांच्या जातीचे स्थान वर जावे. ती एक कोळी समाजातील “दलित वीरांगना” होती आणि हि एक अभिमानास्पद बाब आहे आणि ते तिच्या पराक्रमाचे वर्णन करताना ही बाजू अधोरेखित करतात."</ref>
ओळ ७:
झाशीजवळ असलेल्या भोजला गावामध्ये २२ नोव्हेंबर १८३० मध्ये सदोबा सिंग आणि जमुना देवी यांच्या पोटी झलकारीबाईंचा जन्म झाला.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=1UggIjEuBaAC&printsec=frontcover#v=onepage&q&f=false|title=Indian Revolutionaries 1757-1961 (Vol-1): A Comprehensive Study, 1757-1961|last='Sarala'|first=Srikrishan|date=1999-01-01|publisher=Prabhat Prakashan|year=|isbn=9788187100164|location=|pages=111|language=en}}</ref> एका खेडेगावातल्या मुलीच्या वाट्याला येतात ती सर्वच कामे झलकारी करत असे. तरी तिच्या लहानपणामध्येच तिने काही अचंबित करणाऱ्या बाबी करून आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधले होते. स्थानिक लोक गीतांमध्ये झलकारीच्या वीरतेविषयी अनेक उदाहरणे गायली जातात. झलकारीने कमी वयातच वाघाला कुऱ्हाडीने मारल्याची कथा रंगवून सांगितली जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.rediff.com/freedom/09jhalk.htm|title=Rediff On The NeT: Jhalkari Bai, a little known chapter on a woman's courage in colonial India|website=www.rediff.com|access-date=2017-06-06}}</ref> तसेच झलकारी गायी वळायला गेलेली असताना तिने एका चित्त्याला काठीने मारल्याची कथाही तेव्हढीच प्रसिद्ध आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?id=1UggIjEuBaAC&printsec=frontcover#v=onepage&q&f=false|title=Indian Revolutionaries 1757-1961 (Vol-1): A Comprehensive Study, 1757-1961|last='Sarala'|first=Srikrishan|date=1999-01-01|publisher=Prabhat Prakashan|year=|isbn=9788187100164|location=|pages=112|language=en}}</ref> राणी लक्ष्मी बाईच्या सैन्यातील तोफखान्याचा काम करणाऱ्या पुरण सिंग नावाच्या सैनिकाशी तिचा विवाह झाला होता. ज्याने झलकारीची ओळख राणी लक्ष्मी बाईशी करून दिली होती. झलकारी लक्ष्मीबाई सारखीच दिसायची आणि ह्यामुळे तिला लक्ष्मीबाईच्या स्त्रियांच्या पलटणीमधे सहभागी करून घेतले गेले.<ref name="Sarala" />
== युद्धातील शौर्य==
राणीच्या सैन्यात तिला वेगाने बढती मिळत गेली आणि लवकरच ती स्वतःच्या सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करु लागली.<ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=7feHAwAAQBAJ&oi=fnd&pg=PP1&dq=dalit+virangana&ots=lglJlB_Mes&sig=vOoJv0EVcw9_nvPFmMROVxIRfF&redir_esc=y#v=onepage&q=dalit%20virangana&f=false|title=Women Heroes and Dalit Assertion in North India: Culture, Identity and Politics|last=Narayan|first=Badri|date=2006-11-07|publisher=SAGE Publications India|isbn=9788132102809|language=en}}</ref> १८५७च्या१८५७ च्या बंडाच्या दरम्यान ह्युज रोज यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने झाशीवर आक्रमण केले त्या दरम्यान राणी तिच्या किल्ल्यात स्वतःच्या ४००० सैनिकांसह दबा धरुन बसली होती. कल्पी या गावात छावनी टाकून बसलेल्या पेशव्यांचे सैन्य सोडवणूक करेल या अपेक्षेने लक्ष्मीबाई वाट पहात राहिली. परंतु पेशव्यांचे सैन्य येवू शकले नाही, कारण ते जनरल रोज कडून आधीच हारवले होते. दरम्यान झाशीच्या किल्ल्याच्या एका दरवाज्याची सुरक्षा पाहणारा "दुल्हा जू’ याने इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि झाशीच्या किल्ल्याचा दरवाजा उघडला.जेव्हा ब्रिटीशांचे सैन्य किल्ल्यात शिरले, किल्ल्यात इंग्रजांचे सैन्य झाशीची सैन्य ह्यांमध्ये समोर-समोरचे युद्ध सुरू झाले. ह्या गोंधळाचा फायदा घेत आणि दरबारी व्यक्तींचा सल्ला ऐकत लक्ष्मीबाई मागच्या दरवाज्याने पळून गेली. लक्ष्मीबाईच्या जागेवर झलकारी आली, तिने लक्ष्मीबाईसारखाच पोशाख केलेला होता.<ref>{{जर्नल स्रोत|last=Gupta|first=Charu|date=2007|title=Dalit 'Viranganas' and Reinvention of 1857|दुवा=http://www.jstor.org/stable/4419579|journal=Economic and Political Weekly|volume=42|issue=19|pages=1739–1745}}</ref>
झलकारीने लक्ष्मीबाईशी असलेल्या तिच्या साधर्म्याचा फायदा घेत स्वतः राणी लक्ष्मीबाई असल्याचे भासवत पूर्ण दिवस लढाई चालू ठेवली.<ref name="Varma1951" /><ref>{{स्रोत पुस्तक|दुवा=https://books.google.co.in/books?hl=en&lr=&id=hHhQDwAAQBAJ&oi=fnd&pg=PT292&dq=jhalkari+bai&ots=fJKLO7It9L&sig=hsAJgvaN-lhtTPz2-q5TMkscPEY#v=onepage&q=jhalkari%20bai&f=false|title=Men and Feminism in India|last=Chowdhury|first=Romit|last2=Baset|first2=Zaid Al|date=2018-05-04|publisher=Taylor & Francis|isbn=9781351048224|language=en}}</ref>
 
ओळ १७:
[[भारतीय पुरातत्व सर्वेक्षण|भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण]] विभाग पंच महल येथे झाशीच्या किल्ल्यात झलकारीबाईच्या स्मरणार्थ एक पाच मजली संग्रहालय बांधत आहे.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-newdelhi/asi-to-set-up-jhalkari-bai-museum-at-jhansi-fort/article5734722.ece|title=ASI to set up Jhalkari Bai museum at Jhansi Fort|last=Tankha|first=Madhur|date=2014-02-28|work=The Hindu|access-date=2018-08-10|language=en-IN|issn=0971-751X}}</ref> बी. एल्. वर्मांच्या १९५१ मध्ये लिहिलेल्या “झांसी की रानी” या कादंबरीत झलकारीबाईचा उल्लेख आहे आणि त्यात तिच्यावर उपकथानक तयार केले आहे. त्यांनी झलकारीबाईचा उल्लेख कोळीण आणि लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक सामान्य सैनिक असा केला आहे. राम चंद्र हेरन यांची त्याच वर्षी प्रकाशित झालेली "माटी" ही बुंदेली कादंबरी तिला एक “लढवय्यी आणि शूर शहिद” असे चित्रित करते. झलकारीबाईचे पहिले चरित्र १९६४ मध्ये भवानी शंकर विशारद यांनी, वर्मांची कादंबरी आणि झाशीच्या आसपासच्या कोळी समाजाच्या मौखिक कथांवर संशोधन करून लिहिले.<ref name="BN1">{{harvnb|Badri Narayan|2006|page=119}}</ref>
 
झलकारीबाईची कथा सांगणाऱ्या कथालेखकांनी झलकारीबाईला लक्ष्मीबाईच्या पातळीवर आणून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.<ref name="BN1" /> १९९०च्या१९९० च्या दशकापासून झलकारीबाईच्या कथेने कोळी स्त्रीत्वाच्या उग्र स्वरूपाच्या आदर्श उभा करण्यास सुरुवात केली. ज्याला राजकीय परिमाण मिळाले आणि तिच्या प्रतिमेची सामाजिक परिस्थितीतून येणाऱ्या गरजेप्रमाणे पुनर्निर्मिती सुरू झाली.<ref name="BN2" /> राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांनी १० नोव्हेंबर २०१७ रोजी भोपाळ मधील गुरू तेग बहादुर संकुलामध्ये झलकारीबाईच्या पुतळ्याचे अनावरण केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.dailypioneer.com/state-editions/bhopal/prez-unveils-jhalkari-bais-statue.html|title=Prez unveils Jhalkari Bai’s statue|last=Pioneer|first=The|work=The Pioneer|access-date=2018-08-10|language=en}}</ref>
 
=संदर्भ=