"जोसेफ स्टॅलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १६:
लेनिननंतर सोव्हियेट संघाचे नेतृत्व ट्रॉट्स्की किंवा स्टालिन यांच्यापैकी कोणाला द्यावे असा प्रश्न उपस्थित झाला होता. स्टालिनकडे ट्रॉट्स्की सारखे वक्तृत्वाचे अंग नव्हते पण स्टालिन एक कुशल संघटक, उत्तम प्रशासक, निष्ठावान कार्यकर्ता असल्याने त्यांना सामान्य पक्ष कार्यकर्त्यांचा पाठिंबा होता म्हणून स्टालिनच सोव्हियेट संघाचे नवे राष्ट्राध्यक्ष झाले.
 
यादवी युद्धाच्या काळातच स्टालिन आणि ट्रॉट्स्की यांच्यात अतिशय उग्र मतभेद झाले. १९२८ मध्ये पक्षाने ट्रॉट्स्की यांना हद्दपार करून हे सर्व मतभेद संपविले. त्या आधी १९२७ साली साम्यवादी पक्षाच्या १५ व्या परिषदेने राष्ट्राच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी 'एका राष्ट्रात समाजवाद' ही नीती स्वीकारली व त्यानुसार १९२८च्या१९२८ च्या प्रारंभी राष्ट्रीय नियोजन मंडळाने पहिली पंचवार्षिक योजना सादर केली व १ ऑक्टोबर १९२८ पासून योजनेला मूर्त स्वरूप मिळून प्रत्यक्ष कार्य आरंभ झाले. सोवियेत संघात पंच वार्षिक योजना राबवून त्या यशस्वी करण्याची जबाबदारीही राष्ट्राध्यक्ष म्हणून स्टालिन यांचीच होती. या सगळ्यात ट्रॉट्स्कीचे नाव कोठेही नव्हते.
 
१९२८ ते १९५३ पर्यंत सोव्हियेट संघाचे नेतृत्व स्टालिनकडे होते. स्टालिन यांनी अवघ्या १२ वर्षांच्या काळात देशाची उभारणी केली, जागतिक महासत्ता म्हणून सोवियेत संघ उदयास आले. राष्ट्राध्यक्ष स्टालिन यांच्या पुढाकारानेच सोवियेत संघाची घटना तयार करण्यात आली. त्याप्रमाणे सोव्हियेट संघात समावेष असलेल्या प्रत्येक वांशिक व राष्ट्रीय गटाचे वैविध्य टिकविण्याची महत्त्वाची जबाबदारी स्वतः स्टालिन यांनीच स्वीकारली. तसेच घटनेप्रमाणे सर्व देशावर बोल्शेविक पक्ष आणि केंद्र सरकारचे थेट नियंत्रण ठेवण्यात स्टालिन यशस्वी झाले. प्रत्येक गटाला आणि देशाला महत्त्व दिल्याने अल्पकाळातच प्रत्येक घटक राज्याने नेत्रदीपक प्रगती केली. पण हजारो विरोधकांचे निर्दालन करणारा नरराक्षस असे त्यांना संबोधण्यात येत असे. तसेच [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] सोवियेत संघाची जी अपार हानी झाली त्याचे कारणही स्टालिन यांचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. पक्षशुद्धी मोहिमेत हजारो विरोधकांना मारल्याचा आरोपही स्टालिनवर आहे. देशात स्टालिन यांची एकछत्री हुकुमशाही राजवट होती. सर्वंकष शिस्तीचा पुरस्कर्ता, कठोर मनाचा अशी स्टालिनची प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण झाली.