"जाहिरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ५८:
पुण्यातल्या वेज रेस्टॉरंट्सना जाहिरातीची गरज नसते. संध्याकाळ झाली, की लोकच वाट बघत, नंबर यायची वाट बघत दाराशी उभे राहतात. त्यामुळे हा क्लास जाहिरातींमध्ये ओढण्यासाठी आक्रमक प्रकाशनांनी अनेक क्लृप्त्या शोधून काढल्या. जाहिरातींमध्ये भरमसाठ स्कीम्स अन् डिस्काऊंट्स तर दिलेच, शिवाय, स्पेशल थाली व डिशेस, हॉटेलमधले नम्र व प्रसन्न वातावरण.. इ.ची माहिती लेखांमधून छापायला सुरुवात केली. आता, खवैय्याला काय घेणे आहे, ही माहिती कुठून अन् कशी मिळाली ते? अमूक पेपरमध्ये तुमच्या या डिशबद्दल वाचले, असे जेव्हा तो हॉटेलमालकाला सांगायला जातो, तेव्हा तो मालकही, 'हा, हा. इतके पैसे खर्च केले होते बघा, त्या आर्टिकलसाठी!' अशी फुशारकी मारून सांगतो.
 
संशय घ्यायचाच झाला, तर प्रत्येक गोष्टीचा घेता येईल. विविध राजकीय नेत्यांच्या बातम्या निबातम्यानी भाषणे, पुस्तके / [[नाटके]] / सिनेमे इ.ची परीक्षणे, नवीन शोरूम / व्यवसायाच्या उद्घाटनाच्या बातम्या अशा अनंत गोष्टी मॅनेज्ड असल्याचे कधी कळते, कधी कळत नाही. पेज थ्रीवर उच्चभ्रू लोकांच्या पार्ट्यांचे फोटो असतात. त्यासाठी पडद्यामागे रीतसर 'डील्स'ही झालेली असू शकतात. पार्टीतून विविध हेतु साध्य करून घेणाऱ्या कंपन्यांसारखंच, या छापल्या गेलेल्या फोटोमधूनही विविध हेतु साध्य करून घेतले जातात, या सो-कॉल्ड-सेलेब्रिटीजकडून. त्यावरून सोशल स्टेटसही ठरते, ते वेगळेच. पुण्यात सौरभ गाडगीळ (पु.ना.गाडगीळ कुटुंब), विश्वनाथ कदम, अर्चना किर्लोस्कर, सुलज्जा फिरोदिया, रांका, सायरस व इतर पूनावाला, मीरा कलमाडी, नंदू नाटेकर, अविनाश भोसल्यांची मुले असे अनंत लोक या अशा पेज थ्री, पार्ट्या अन् समारंभांतून आपले अस्तित्व धगधगते राहील, सारखे लोकांसमोर येईल, अन् त्याचा फायदा आपल्या उद्योग-व्यवसाय, राजकारण इ.ला मदत होईल- याची व्यवस्थित काळजी घेतात. हे 'पेड एडिटोरियल' नसले तरी भविष्यात होणारे फायदे, परस्परसंबंध जपण्यासाठीच हे केले जाते. पण हा थोडा वेगळा विषय आहे, अन् इथे बऱ्यापैकी अप्रस्तूत.
 
जाहिरात हा माहितीचा अविभाज्य भाग होऊ लागला आहे. जाहिरातीच्या या बदलत्या फॉर्म्सबद्दल त्या करणाऱ्यांची तक्रार नाही, वाचणाऱ्या-बघणाऱ्यांचीही नाही. छापणाऱ्यांनीच का करावी मग?
"https://mr.wikipedia.org/wiki/जाहिरात" पासून हुडकले