"कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ३८:
वडील श्रीनिवास कृष्ण तथा अण्णाशास्त्री यांच्याकडे पारंपरिक पद्धतीने संस्कृताचे अध्ययन केल्यावर {{लेखनाव}} यांनी पुण्यात [[विष्णूशास्त्री वामन बापट]] यांनी सुरू केलेल्या [[आचार्यकुल|आचार्यकुलात]] तीन वर्षे राहून ([[आद्य शंकराचार्य|शांकर]])[[वेदान्त|वेदान्ताचा]] अभ्यास केला. पुण्याच्या [[वेदशास्त्रोत्तेजकसभा|वेदशास्त्रोत्तेजकसभेची]] परीक्षा देऊन अद्वैत-वेदान्त-कोविद ही बी.ए.-समकक्ष पदवी त्यांनी १९४१ साली वयाच्या १५व्या वर्षी मिळवली. बेळगावला परत जाऊन त्यांनी एक वर्ष कारकुनाची नोकरी केली. ती करीत असताना त्यांना पारंपरिक विद्येचा उपजीविकेसाठी थेट उपयोग नाही हे लक्षात आले. त्यामुळे ते [[विश्वनाथ विनायक पेंडसे|विश्वनाथ विनायक तथा अप्पा पेंडसे]] यांच्या प्रेरणेने पुण्याला परत आले. तिथे आल्यावर अर्जुनवाडकरांनी अनेक अडथळे पार करून आधुनिक शिक्षणव्यवस्थेत शिरकाव करून घेतला. वयाच्या सोळाव्या वर्षी इयत्ता (मराठी) पहिलीत एक वर्ष त्यांनी काढले. पारंपरिक अध्ययनातून झालेल्या तयारीची कल्पना आणि कदर असणारे रड्डी नावाचे शिक्षणाधिकारी ([[दंडी]]च्या [[काव्यादर्श|काव्यादर्शावरचा]] सटीक ग्रंथ [[बेलवलकर|श्रीपाद कृष्ण बेलवलकर]] यांच्याबरोबर लिहिणारे संस्कृतज्ञ पंडित [[रंगाचार्य बालकृष्णाचार्य रड्डी]] यांचे पुत्र) यांच्यामुळे अर्जुनवाडकरांना इंग्रजी पहिलीत थेट प्रवेश मिळाला. शिक्षणाच्या व्यापक उद्दिष्टांबद्दल स्पष्टता आणि शिक्षणाची आच असणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल अपार आस्था असणारे पुण्याच्या जिमखाना भावे स्कूलचे द्रष्टे मुख्याध्यापक [[नीलकंठ वा. किंकर|नी.वा. तथा बापूसाहेब किंकर]] यांनी परीक्षा घेऊन त्यांना थेट इंग्रजी सहावी अर्थात् प्री-मॅट्रिक वर्गात प्रवेश दिला. ते १९४६मध्ये मॅट्रिक झाले. या परीक्षेतल्या त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना संस्कृतातल्या प्रावीण्यासाठी असलेली [[जगन्नाथ शंकरशेट]] शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीसाठीची अर्जुनवाडकरांची तयारी त्यांचे गुरू आणि पुढील काळातले सहकारी [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] यांनी करून घेतली होती.
 
पुढील काळात [[सं-म-त]] अर्थात् संस्कृत-मराठी-तमिळ यांच्या भाषिक नात्यांबद्दल नवीन सिद्धान्त मांडणारे भाषातज्ज्ञ [[विश्वनाथ आबाजी खैरे]], १९६०च्या१९६० च्या दशकात काँग्रेस गवतामुळे निर्माण झालेल्या ॲलर्जीचा अभ्यास करणारे त्वचारोगतज्ञ [[अरविंद लोणकर]], कृषि-अर्थशास्त्रज्ञ, महाराष्ट्रातील आर्थिक-सामाजिक चळवळींचे अभ्यासक आणि लेखक [[सखाराम हरी देशपांडे]], संस्कृतज्ञ आणि मराठी कवी [[वसंत संतू पाटील]] हे त्यांचे या काळापासूनचे जवळचे मित्र.
 
पुढचे शिक्षण (बी.ए. १९५१, एम्.ए. १९५६) कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकरांनी स्वतःच्या हिमतीवर, जवळच्या मित्रांच्या मार्गदर्शनाच्या आधारावर, आणि फोटोग्राफीसह अनेक उद्योगांतून अर्थार्जन करून घेतले. फोटोग्राफीचे शिक्षण त्यांना वडील बंधू [[विनायक श्रीनिवास अर्जुनवाडकर]] आणि एका पिढीतील प्रख्यात फोटोग्राफर [[डॉक्टर एम्. (मोरोपंत) कानिटकर]] यांच्याकडून मिळाले. स्वातंत्र्यवीर [[विनायक दामोदर सावरकर]] यांचे विचारमग्न अवस्थेतील बाजूने काढलेले प्रसिद्ध छायाचित्र (portrait/profile) अर्जुनवाडकरांनी टिपले होते.
ओळ ४९:
 
==संस्था==
अर्जुनवाडकरांनी [[ज्ञान प्रबोधिनी|ज्ञान प्रबोधिनीच्या]] संस्कृत-संस्कृति-संशोधिका अर्थात संत्रिका या विभागाची स्थापना करून या विभागाला वेळोवेळी दिशादर्शन (१९७५-९०) केले. त्यांच्या प्रेरणेतून आणि संत्रिकेच्या माध्यमातून १९७६च्या१९७६ च्या सुमारास सुरू झालेले अभिजात संस्कृत आणि इंग्रजी वाङ्मयाचे वर्ग पुढे सुमारे ३० वर्षं संस्कृतज्ञ [[लीला अर्जुनवाडकर]] आणि [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]], तसेच इंग्रजीचे अभ्यासक [[प्रा. ढवळे]] आणि [[प्रा. मंगळवेढेकर]] यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला [[ज्ञान प्रबोधिनी|ज्ञान प्रबोधिनीत]] आणि नंतर इतरत्र चालवले गेले.
 
त्यांनी निवृत्तीनंतर ज्ञानमुद्रा हा संगणक अक्षरजुळणी उद्योग सुमारे १४ वर्षं [[गौतम घाटे]] आणि [[सुरेश फडणीस]] या तरुण सहकाऱ्यांच्या मदतीने चालवला. योग्य वळणाच्या देवनागरी अक्षरमुद्रा (fonts) सहजी उपलब्ध नसण्याच्या संगणक अक्षरजुळणीच्या सुरुवातीच्या काळात त्याही तयार करून घेतल्या. तसेच रोमन लिपीत संस्कृत मजकूर लिहिताना वापरण्यात येणारी विशेष चिह्ने (diacritical marks) असलेल्या रोमन अक्षरमुद्राही तयार केल्या. ज्ञानमुद्रेत अक्षरजुळणी झालेला विशेष उल्लेखनीय ग्रंथ म्हणजे मंगरूळकर-केळकरांनी संपादित केलेली आणि मुंबई विद्यापीठाने प्रकाशित केलेली ’ज्ञानदेवी’ (तपशील खाली दिले आहेत).
ओळ ६३:
* '''[[अर्धमागधी]] : घटना आणि रचना''', [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५८).{{दुजोरा हवा}}
* '''मराठी : घटना, रचना, परंपरा''', [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९५८).{{दुजोरा हवा}}
* '''प्रीत-गौरी-गिरीशम्''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (रचना १९६०च्या१९६० च्या सुमारास; स्वप्रकाशित, १९९३). ही कवी कालिदासलिखित कुमारसंभव या काव्याच्या पाचव्या सर्गाच्या कथानकावर आधारलेली व संस्कृतात दुर्मीळ अशा अन्त्य यमकांचा विपुल वापर असलेली आणि गेयता डोळ्यापुढे ठेवून रचलेली संगीतिका आहे. काही ऐतिहासिक तपशील: या संगीतिकेचा एकमेव प्रयोग १९६०च्या१९६० च्या सुमारास पुण्याच्या [[नौरोसजी वाडिया महाविद्यालय|नौरोसजी वाडिया महाविद्यालयात]] [[नरहर गोविंद सुरू|प्राचार्य न. गो. सुरूंच्या]] प्रेरणेने झाला. संगीतिकेचे संगीत, गायक (आणि पुण्याच्या आर्य संगीत प्रसारक मंडळाचे माजी सचिव) दाजी अर्थात विजय करंदीकर यांचे होते. प्रत्यक्ष गायन राम श्रीनिवास अर्जुनवाडकर (सूत्रधार), [[लीला अर्जुनवाडकर]] (उमा), शकुंतला चितळे (सखी) आणि [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] (बटू/शिव) यांनी केले होते. नंतरच्या काळात या संगीतिकेचे नृत्यनाट्य स्वरूपातले प्रयोग २००६च्या२००६ च्या सुमारास आणि त्यानंतरही, समीक्षक दिवंगत दत्ता मारुलकर यांच्या कन्या नृत्यांगना प्रज्ञा अगस्ती यांनी, आणि इ.स. २००९च्या२००९ च्या सुमारास अनुराधा वैद्य यांनी पुण्यात आणि इतरत्र केले.
*'''[[मम्मटभट्ट]]विरचित [[काव्यप्रकाश]]''', [[अरविंद मंगरूळकर|अरविंद गंगाधर मंगरूळकर]] आणि कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (संपादक) (प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, पुणे, १९६२). "व्यापक उपन्यास, पहिला-दुसरा-तिसरा-दहावा या उल्लासांचा मूलपाठ, मराठी भाषांतर आणि विस्तृत, चिकित्सक विवेचन, अध्ययनोपयोगी विविध सूची, - या सामग्रीने परिपूर्ण" (ग्रंथाच्या शीर्षकपृष्ठावरून उद्धृत).
* '''छंदःशास्त्राची चाळीस वर्षे''', कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर (नवभारत मासिक, सप्टेंबर १९६२). [http://www.vechak.org/] इथे उपलब्ध.