"एचएमएस बीगल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ १:
[[चित्र:HMSBeagle.jpg|thumb|right|[[ऑस्ट्रेलिया]]च्या सर्वेक्षणाच्या मोहिमेवर निघालेले एचएमएस बीगल. इ. स. १८४१ मधील जलरंगांतील चित्र, ओवेन स्टॅन्ली]]
 
'''एचएमएस (हर मॅजेस्टी शिप) बीगल''' हे ब्रिटनच्या शाही नौदलाचे एकडोलकाठी गलबत होते. टेम्झ नदीवरील वुल्विच डॉकयार्डमधून ११ मे १८२० रोजी ते जलप्रवासास सोडण्यात आले. [[बीगल (कुत्रा)|बीगल]] या कुत्र्याच्या जातीवरून नाव देण्यात आलेल्या या गलबताच्या बांधणीस £७,८०३ एवढा खर्च आला होता. १८२०च्या१८२० च्या जूनमध्ये राजा चौथा जॉर्ज याच्या राज्याभिषेकाच्या उत्सवात बीगलने भाग घेतला आणि नव्या [[लंडन ब्रिज]]खालून जाणारे ते पहिले जहाज ठरले. नंतर निकड नसल्याने बीगल राखीव ताफ्यात राहिले. नंतर सर्वेक्षणासाठी [[बार्क]] म्हणून त्याचा स्वीकार करण्यात आला आणि तीन मोहिमांमध्ये बीगलने भाग घेतला. यांपैकी दुसऱ्या मोहिमेत असलेल्या [[चार्ल्स डार्विन]] या तरुण निसर्गवाद्याच्या अभ्यासामुळे अखेर बीगल हे इतिहासातील सर्वाधिक प्रसिद्ध गलबतांपैकी एक ठरले.
 
[[वर्ग:रॉयल नेव्ही]]