छो
शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती) |
||
ओळ २:
'''आन्श्लुस''' ({{lang-de|Anschluss}}, मराठी अर्थ: ऑस्ट्रियाचे विलिनीकरण) ही [[ऑस्ट्रिया]] देशाच्या इतिहासातील एक महत्त्त्वपूर्ण घटना होती. १२ मार्च १९३८ रोजी [[ॲडॉल्फ हिटलर]]च्या नेतृत्वाखाली [[नाझी जर्मनी]]ने संपूर्ण ऑस्ट्रिया देशावर कब्जा मिळवला व ऑस्ट्रियाचा पूर्ण भूभाग आपल्या अधिपत्याखाली आणला. १९३८ ते १९४५ दरम्यान एकत्रित राहिल्यानंतर [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धातील]] जर्मनीच्या पराभवासोबतच आन्श्लुसदेखील संपुष्टात आले व ऑस्ट्रिया देश पुन्हा स्वतंत्र व सार्वभौम बनला.
जर्मनी व ऑस्ट्रिया ह्या देशांत [[जर्मन भाषा|जर्मन भाषिक]], मिळत्याजुळत्या वंशाचे व संस्कृतीचे लोक प्रामुख्याने असल्यामुळे एकत्रीकरणाचे वारे दोन्ही देशांमध्ये अनेक वर्षांपासून वाहत होते. १८७१ साली प्रामुख्याने [[प्रशियाचे राजतंत्र|प्रशियाच्या]] प्रभावाखाली घडलेल्या [[जर्मनीचे एकत्रीकरण|जर्मनीच्या एकत्रीकरणामध्ये]] ऑस्ट्रिया वगळला गेला होता. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धाअखेरीस]] [[ऑस्ट्रिया-हंगेरी]] राष्ट्र कोलमडले व [[पहिले ऑस्ट्रियन प्रजासत्ताक|पहिल्या ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाचा]] उदय झाला. ह्यादरम्यानच ऑस्ट्रियाला जर्मनीसोबत एकत्रित होण्यात रस होता परंतु [[व्हर्सायचा तह|वर्सायच्या तहातील]] अटींमुळे हे अशक्य झाले होते. परंतु बहुसंख्य ऑस्ट्रियन जनतेला एकत्रीकरण हवे होते. [[वायमार प्रजासत्ताक]] व ऑस्ट्रियन प्रजासत्ताकाच्या संविधानातच एकत्रीकरणाचा उद्देश सामील केला गेला होता.
ह्याच काळात ऑस्ट्रियामध्ये सत्तेवर असलेला ख्रिस्ती समाजवादी पक्ष एकत्रीकरणाच्या विरोधात होता. तत्कालीन ऑस्ट्रियन चान्सेलर [[एंगेलबर्ट डॉलफस]] ह्याने ऑस्ट्रियन संसद बरखास्त केली व ऑस्ट्रियन नाझी पक्षावर बंदी घातली. परंतु ऑस्ट्रियन नाझी पक्षाची लोकप्रियता व प्रभाव वाढतच राहिला व त्याने ऑस्ट्रियन सरकारविरुद्ध अतिरेकी हल्ले चालू ठेवले. १९३४ सालच्या डॉलफसच्या हत्त्येनंतर सत्तेवर आलेल्या कर्ट शुश्निगने डॉलफसची नाझी-विरोधी धोरणे कायम ठेवली. ह्यामुळे खवळून उठलेल्या नाझी जर्मनीने ऑस्ट्रियावर संपूर्ण बहिष्कार टाकला ज्याचा परिणाम म्हणून लवकरच ऑस्ट्रियाची अर्थव्यवस्था घायकुतीला आली. अखेर ११ जुलै १९३६ रोजी शुश्निगने जर्मन राजदूत [[फ्रांत्स फॉन पापेन]]सोबत करार केल्या ज्यामध्ये त्याने कैद केलेल्या नाझी पुढाऱ्यांची सुटका केली व नाझी पक्षाला अतिरेकी हल्ले थांबवण्याचे आवाहन केले. परंतु हिटलरला हा करार पटला नाही.
|