"दादर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २९:
''दादर'' या शब्दाचा अर्थ ''जिना'' किंवा ''शिडी'' असा आहे. पूर्वी [[परळ]] आणि [[माहीम]] यांच्यामधे चालायचे रस्ते फार थोडे होते. इतरत्र माळरान, खाड्या आणि डबकी होती. या भागातील लोकांनी ही जागा दगड-मातीने भरली. अशाप्रमाणे दादरने सखल परळला थोड्या उंचावरच्या माहिमला जोडले. म्हणून ''दादर'' ह्या नावाने प्रसिद्ध झाले.
 
१८९९- १९०० दरम्यान दादर- माटुंगा- वडाळा-शींव हा सगळा परिसर योजनाबद्ध विकसित केलेला मुंबईतील पहिला उपनगरी भाग होता. १८९०च्या दरम्यान आलेल्या प्लेगच्या साथीमुळे शहर विकास प्राधिकरणाने मुख्य शहरामधील गजबजाट कमी करता यावा यासाठी एक विकास योजना तयार केली. त्यावेळी करण्यात झालेल्या परीक्षणा प्रमाणे दादर-माटुंगा परिसरात ६०,०००च्या आसपास, त्याच संख्येत माटुंगा-शींव परिसरात आणि ८५,००० च्या०००च्या आसपास लोकांना शिवडी-वडाळा परिसरात वसवण्याचे योजले होते.
 
योजनेप्रमाणे बांधकामांस सुरुवात झाली. यात प्रमुख भर हा सांडपाण्याच्या व्यवस्थेवर होता. इमारतींची उंची तीन मजल्यांपेक्षा जास्त नसावी तसेच दोन इमारतींमध्ये योग्य अंतर असावे असे ठरले. या योजनेत रहिवासी इमारतीं सोबतच व्यावसायिक आणि शैक्षणिक इमारतीसुद्धा होत्या. खेळाची मैदाने तसेच उद्यानांसाठीही जागा राखून ठेवण्यात आली होती.
"https://mr.wikipedia.org/wiki/दादर" पासून हुडकले