"शिरस्त्राण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ९:
ख्रिस्तपूर्व काळातील प्राचीन ग्रीस व रोममध्ये मेणात उकळून कडक केलेल्या चामड्यापासून अथवा पंचधातूंपासून साध्या टोपीसारखी बनविलेली शिरस्त्राणे वापरली जात. पुढे त्यांवर कोंबड्याच्या तुऱ्या सारखा मागे व पुढे लोंबणारा धातूचा तुरा बसवू लागले. हा प्रकार अथीना या ग्रीक देवतेच्या पुतळ्यामध्ये दिसून येतो. रोम शहरात नागरिकांच्या करमणुकीसाठी जी द्वंद्वे आयोजिली जात, त्यात लढणाऱ्या योद्धाची म्हणजे ग्लॅडिएटरची शिरस्त्राणे वैशिष्ट्यपूर्ण असत [रोमन ग्लॅडिएटर]. त्यांची कड रुंद असे व त्यावर चेहऱ्याच्या संरक्षणासाठी खालती ओढता येणारी झडप असून बघण्यासाठी तिच्यात झरोका असे.
 
पुढे उत्तर व पश्चिम युरोपमध्ये वापरात असलेली शिरस्त्राणे म्हणजे अर्धगोल अथवा शंकूच्या आकाराच्या टोप्या असत. प्रारंभी पंचधातू अथवा लोखंडाच्या पट्ट्यांनी मजबुती दिलेल्या चामड्यापासून बनविलेली ही शिरस्त्राणे पुढे पूर्णतया धातूंचीच बनू लागली. नाकाचा बचाव करण्यासाठी इ. स. १००० च्या१०००च्या सुमारास धातूची जाडी कांब त्यावर बसविण्यात आली. हा शिरटोप घालण्यापूर्वी बारीक आकाराच्या लोखंडी साखळ्यांपासून बनविलेले आवरण प्रथम डोक्यावर घालून त्यावर शिरस्त्राण चढवत असत. भारतात राणाप्रताप यांच्या तैलचित्रातील शिरस्त्राणात या प्रकारची वैशिष्ट्ये दिसतात.
 
पुढे इ. स. सु. १२०० च्या१२००च्या आसपास, शिरस्त्राणांवर प्रहार झाला, तरी तो निसटताच व्हावा या हेतूने त्यांना गोलसर आकार देऊन त्याची खालची कड छातीच्या सुरक्षा-कवचापर्यंत लांब करण्यात आली. पुढील शतकात डोळ्यांपुढची झडप खालीवर करण्याची सोय करण्यात आली. तसेच हनुवटी व मान प्रहारापासून वाचविण्यासाठी वेगळ्या [[लोखंडी]] पट्ट्या वापरात आल्या. तांत्रिकदृष्ट्या सर्वांत महत्त्वाची अशी शिरस्त्राणातील सुधारणा इ. स. १५०० च्या१५००च्या सुमारास झाली. कारागिरांनी बिजागरीचा वापर करून मानेवर आणि हनुवटीखाली पक्के बसेल असे शिरस्त्राण बनवले की, जेणेकरून त्यावर आघात झाला, तरी ते डोळ्यांपासून वेगळे होणार नाही. पायदळातील सैनिकांसाठी व औपचारिक समारंभप्रसंगी वापरण्यासाठी कमी वजनाची शिरस्त्राणेही वापरात आली. रोममध्ये पोपचे अंगरक्षक अशी हलकी शिरस्त्राणे वापरताना दिसतात. अठराव्या-एकोणिसाव्या शतकांत घोडदळातील सैनिकही अशी शिरस्त्राणे वापरू लागले. [[युरोप]]<nowiki/>मध्ये घोडदळांच्या काही तुकड्या आजही विशेष समारंभासाठी घालावयाच्या पोशाखात शिरस्त्राणांचा अंतर्भाव करतात.
 
पोलादापासून बनविलेल्या शिरस्त्राणाचा वापर पहिल्या महायुद्धापासून (१९१४–१८) सरसकट सुरू झाला. १९१४ साली [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच]] सैन्यात, १९१५ साली ब्रिटिश सैन्यात व त्यानंतर इतर युरोपीय व अमेरिकन सैन्यांत गोल आकाराची व हनुवटीखाली पट्ट्याने आवळून बसवता येतील, अशी शिरस्त्राणे वापरात आली. बंदुकीच्या गोळ्या अथवा तोफगोळ्यांचे तुकडे लागले, तरी ते बहुशः निसटून जावेत इतपत ते पोलाद कठीण असते आणि त्या पत्र्याची जाडी कमी असल्यामुळे ते हलकेही असते. ब्रिटन, अमेरिका, रशिया व जर्मनी यांची दुसऱ्या महायुद्धातील शिरस्त्राणे त्यांच्या त्यांच्या खास आकाराच्या बांधणीमुळे ओळखता येतात. सोव्हिएट रशियाला तोंड देण्यासाठी उभारलेल्या नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनच्या (नाटोच्या) फौजांकरिता एकाच नमुन्याचे शिरस्त्राण तयार करण्यात आले.