'''विष्णू नारायण भातखंडे''' यांचा जन्म [[ऑगस्ट १०]], [[इ.स. १८६०|१८६०]] रोजी [[जन्माष्टमी]]च्या दिवशी [[मुंबई]] येथील वाळकेश्वर भागात झाला. लहानपणापासूनच त्यांचे संगीतकलेवर विशेष प्रेम होते. वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी ते उत्तम [[बासरी]] वाजवायचे. [[मराठी]] शाळेतील व हायस्कूलचे शिक्षण झाल्यानंतर भातखंडे एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी.ए. झाले. याच काळात त्यांनी गोपालगिरी यांच्याकडून [[सतार|सतारीचे]] धडे आत्मसात केले.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Sangitacharya%20pt.%20Vishnu%20Narayan%20Bhankhande.pdf|title=संगीताचार्य पं. विष्णू नारायण भातखंडे|last=रातंजनकर|first=श्री.ना.|date=|website=महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref>