"ला जेटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
ओळ ६:
ज्याला आपल्या लहानपणची एका क्रूर घटनेची आठवण त्रास देत असते, पण त्या घटनेचा अर्थ काही वर्षांनी कळतो, अशा माणसाची ही कथा आहे. तिसरया महायुद्धापूर्वी एका संध्याकाळी एक लहान मुलगा आपल्या आईवडलांबरोबर पॅरीसच्या ऑर्ली विमानतळावर फिरण्यासाठी गेला असतां, त्याला तेथे एक तरुणी दिसते. थोड्याच वेळात तिचा चेहेरा आणि भोवतालच्या जमावातील माणसांचे भेदरलेले चेहरे पाहून त्याला कळते की, तेथे कोणाचातरी मृत्यू झालेला आहे.यानंतर काळ जातो व तिसरे महायुद्ध होते. पॅरीस सकट सर्व जग उद्ध्वस्त होते. सर्वत्र किरणोत्सर्ग पसरल्या मुळे मानव जात जमिनीखाली राहण्यास सुरुवात करते. आता शास्त्रन्यांचे सध्याच्या स्थितीतून बाहेर पडण्याचे मार्ग शोधतात. पण प्राप्त परिस्थीत मध्ये काही मार्ग नसतो . तेव्हा ते भूतकाळातून वा भविष्यकालातुन मदत मिळवायचे प्रयत्न करतात. त्यासाठी कालप्रवासाची मदत घेतली. यात प्रयोग म्हणून युद्धात कैदी झालेल्यांना वापरले जाते. सुरुवातीलाच दाखवलेला लहान मुलगा आता अशाच एका जमिनीखालील तळात कैदी आहे. कालप्रवास हे प्रचंड मानसिक तणावाचे काम असते त्यामुळे सर्वच जण त्यास झेलु शकत नाहीत. प्रयोग दरम्यान काही मरतात, काही वेडे होतात तर काही कोमात जातात. म्हणुन शास्त्रज्ञ मानसिक दृष्ट्या कणखर व्यक्ती शोधु लागतात. जे भुतकाळाची आठवण सहजपणे काढु शकतात त्यांची निवड करण्यास प्राधान्य दिले जाते. यासाठी कैद्यांच्या स्वप्नांवर पाळत ठेवतात.
 
कथेच्या नायकाला आपल्या लहानपणाची विमानतळावरील आठवण सतत सतावत असते. पण त्यामुळेच प्रयोगासाठी त्याची निवड होते. शास्त्रज्ञ त्याला प्रयोगाची माहिती देऊन प्रथम भुतकाळात पाठवतात. तिसरया महायुद्धापूर्वीचा काळ. यात नायक फिरतो अनअन् एका क्षणी त्याला लहानपणी पाहिलेल्या घटनेतली तरुणी पुन्हा दिसते. त्यांची दोघांची नजरानजर होते. काही दिवसांना तो बोलायचा प्रयत्न करतो व ती ही प्रतिसाद होते. काही दिवसांनी त्यांच्यात मैत्री होते व दोघे पॅरिस मध्ये फिरु लागतात. काही दिवसांत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रयोगादरम्यान नायक सतत भुतकाळात नसतो. त्याचे नियंत्रण शास्त्रज्ञ करत असतात. त्याला वारंवार माघारी बोलवतात व पुन्हा भुतकाळात पाठवतात. त्या तरुणीनेही त्याचे हे मध्येच सोडुन जाणे पुन्हा परतने स्वीकारले असते. पण एके दिवशी शास्त्रज्ञ त्याला परत बोलवतात व आता भुतकाळाचे प्रयत्त्न थांबवुन भविष्यकाळात पाठवण्याचे ठरवतात. मुळात भुतकाळातील प्रवास हा प्रशिक्षणा सारखा असतो ज्याजोगे व्यक्तीला कालप्रवासाची सवय व्हावी व त्याचा उपयोग करून त्यांना अनोळखी भविष्यकाळात संचार करण्याची मानसिक तयारी व्हावी.
 
बरयाच प्रयत्नांनी नायक भविष्यकाळात प्रवेश करु शकतो. तो बघतो की भविष्यकाळ आश्वासक आहे , समृद्ध आहे. मानव जात पुन्हा उभी राहिली आहे. तो भविष्यातील मानवांकडे मदतीची याचना करतो पण ते नकार देतात. तेव्हा नायक म्हणतो त्याप्रकारे तुम्ही मानवजातीचा भविष्यकाळ आहात तेव्हा स्वतःच्या अस्तित्वासाठी तुम्हाला मला म्हणजे तुमच्या भुतकाळाला मदत द्यावीच लागेल. भविष्यातील मानव त्याला त्यांच्यात प्रवेश देत नाहीत पण मदत म्हणुन मानवजातीच्या उर्जेच्या मागणी पुरवठा करणारी यंत्रना देतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/ला_जेटी" पासून हुडकले