"राजाराम भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ६९:
राजाराम हा मुळात शांत स्वभावाचा माणूस होता. त्याने राज्यकारभाराची घडी व्यवस्थित घालण्याचा प्रयत्न केला व त्यात तो बऱ्यापैकी यशस्वी झाला. व्यक्तिगतरीत्या तो गुणी, धोरणी व मुत्सद्दी राजकारणी होता. त्याच्या म्हणजे त्याने एका पत्रात त्याने दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली. काळ पाहीला तर औरंगजेब दक्षिण गिळंकृत करत होता, राजारामाकडे पैसे नव्हते, पुरेसे सैन्य नव्हते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालू या असे त्याच्या अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला? बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही. (इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ती लगेच झाली. १७२८ला साली निझामाने पुणे घशात घातल्यावर बाजीरावाने औरंगाबादवर हल्ला चढविला) हे गुण राजारामाला त्याव्या वडिलांकडून आले. एवढेच नाहीतर त्याने वडिलांसारखी सुरतेला तिसऱ्यांदा हल्ला चढविण्याची तयारी केली होती, पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाबला द्यावा लागला..
 
राजाराम महाराज महाराष्टात परत १६९८मध्ये आले. त्यांनी आल्याबरोबर आपला पवित्रा बदलला. आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी. नंतर मात्र ज्या झाल्या त्या आक्रमण करण्यासाठी. मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असूनही टिकत नव्हते कारण त्यांचा राजा हाल सोसून त्यांना लढण्यास भरीस पाडत होता. स्वतः स्वाऱ्यांवर जात होता. औरंगजेबाने त्याच्या युद्धनीतीत १६९८ ला१६९८ला परत बदल करून मोठी चढाई केली. त्याला घाबरून जाऊन परत एकदा जिंजीला जाण्याबद्दल बोलणे चालले पण त्या बोलण्यास राजाराम महाराजांनी नकार दिला व त्यांनी स्वतःच अनेक स्वाऱ्या चालू केल्या. गदग, वऱ्हाड येथे जाऊन संपत्ती लुटून आणली. महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा उल्लेख आहे पण त्या स्वारीबद्दल जास्त माहिती नाही. संताजी व धनाजी असे दोन थोर सेनापती त्याला लाभले. भरताने जसे रामाचे राज्य स्वीकारले तसे राजारामाने शाहूचे (संभाजीचे) राज्य स्वीकारले. त्याला छत्रपतीपदाचा मोह नव्हता. कित्येक कागदपत्रांत हे दिसून येईल की तो बरेचदा राज्य थोरल्या भावाचे आहे व मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहितो. असा थोर राजा महाराष्ट्राला लाभला हे मराठी लोकांचे भाग्य. त्यांनी नवीन राष्ट्र उदयास आणले ही त्यांची कामगिरी. जुन्या इतिहासकारांनी राजारामवर थोडा अन्यायच केला असे वाटते. नवीन पुस्तकांत मात्र त्यांना जे श्रेय दिले पाहिजे ते दिले जात आहे.
 
==छत्रपती राजाराम महाराजांबद्दलचे लेखन/ मराठी पुस्तके==