"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ६:
* १६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने [[ट्विटर]] या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलिवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर मी टू हा हॅशटॅग वापरा असे तिने आवाहन केल्यावर, एका दिवसात सुमारे ४०००० लोकांनी, ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या, #MeToo हा हॅशटॅग (#) वापरला.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.chicagotribune.com/lifestyles/ct-me-too-campaign-origins-20171019-story.html|title=Meet the woman who coined 'Me Too' 10 years ago — to help women of color|last=Ohlheiser|first=Abby|work=chicagotribune.com|access-date=2018-10-22|language=en-US}}</ref>
* या नंतर अनेक [[अभिनेत्री]] आणि सामान्य स्त्रियांनी #मीटू (#MeToo) वापरून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या तसेच न्याय मागितला.
* १८ ऑक्टोबर २०१७ ला२०१७ला ऑलिम्पिक जिमनॅस्टिक्स खेळाडू मॅकायला मरोनी हिने अमेरिकन जिम्नॅस्टिक्स टीमचे डॉक्टर लॅरी नासर यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाला वाचा फोडली. जवळपास ३० वर्षाहून अधिक काळ टीमचे डॉक्टर असरे नास्सर सध्या बालकांच्या लैंगिक शोषणा संदर्भातील एका खटल्यात कारागृहात आहेत.
* २९ ऑक्टोबर २०१७ रोजी ॲन्थनी रॅप याने केव्हिन स्पेसी या ऑस्कर पारितोषिकप्राप्त अभिनेत्याविरुद्ध शोषणाचे आरोप केले. या नंतर अनेक स्त्री तसेच बाल कलाकारांनी असेच आरोप केले आणि स्पेसी विरुद्ध जनमत तयार झाले.
* यानंतर अनेक व्यवसायांतील बड्या धनदांडग्यांनी केलेल्या लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या स्त्री पुरुषांनी आवाज उठवला आणि अनेक प्रकरणात स्टुडिओ आणि कंपन्यांना अशा लोकांविरुद्ध कारवाई करावी लागली.
 
==निर्माती==
* ट्विटर संकेत स्थळावर जरी आलीस मिलानो हिने #मी टू (#MeToo) चा वापर प्रचलित केला असला तरी हे शब्द लैंगिक शोषणासंदर्भात वापरण्याचे श्रेय [[:en:Tarana Burke|तराना बर्क]] या स्त्री हक्क कार्यकर्तीला जाते.
* १९९७ साली एका तेरा वर्षाच्या लैंगिक शोषणाची शिकार बनलेल्या मुलीशी त्या बोलत होत्या. "तिला कसा प्रतिसाद द्यावा हेच मला सुचत नव्हते. 'मी सुद्धा' अशा अत्याचाराची शिकार आहे हे सुद्धा मी तिला सांगू शकले नाही. अनेक वर्ष हा प्रसंग माझ्या मनात घर करून राहिला."
* या संभाषणानंतर १० वर्षांनी तराना बर्क यांनी 'जस्ट बी' (Just Be) या ना-नफा संस्थेची स्थापना केली. लैंगिक अत्याचाराची आणि हिंसेची बळी ठरलेल्या स्त्रियांच्या मदतीसाठी ही संस्था काम करते. तराना यांनी या चळवळीला "मी टू" नाव दिले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.nytimes.com/2017/10/20/us/me-too-movement-tarana-burke.html|title=The Woman Who Created #MeToo Long Before Hashtags|access-date=2018-10-22|language=en}}</ref>
ओळ ५१:
* म्युलर हिनं गेल्या वर्षी १३ ऑक्टोबरला #balancetonporc असं लिहून एक ट्विट केलं होतं. वृत्तवाहिनीत तिच्यासोबत काम करणाऱ्या एरिक ब्रायन या सहकाऱ्यावर तिनं या ट्विटद्वारे काही आरोप केले होते.
* एरिकनं याबद्दल आपली जाहीर माफी मागितल्याचंही तिनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. तिच्या ट्विटनंतर एरिकनं एका वृत्तपत्रात लेख लिहून म्युलरचे आरोप मान्य केले होते.
* म्युलरनंही ही लढाई अखेरपर्यंत लढण्याची तयारी केली आहे. या खटल्यामुळं लैंगिक अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर येईल. अशा प्रकारांचा सामना कसा करायचा, यावर व्यापक चर्चा झडेल, अशी आशा तिनं व्यक्त केली आहे. लैंगिक अत्याचारावर सडेतोड मत मांडल्याबद्दल 'टाइम्स' मासिकानं तिचा 'सायलेन्स ब्रेकर' म्हणून गौरव केला होता. तसंच, तिचा समावेश २०१७ च्या२०१७च्या 'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत केला होता.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.theguardian.com/world/2019/sep/25/woman-behind-french-metoo-sandra-muller-guilty-defaming-media-boss|title=Woman behind 'French #MeToo' found guilty of defaming media executive|last=Chrisafis|first=Angelique|work= is the Guardian's Paris correspondent.|access-date=2019-09-25|language=en-US}}</ref>
 
== 'मी टू' पासून 'यू टू?' पर्यंत ==