"मराठी रंगभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.९)
ओळ ११:
 
'''मराठी रंगभूमीवरील बुकिश नाटके:-'''
मराठी रंगभूमीवर बुकिश नाटकांची लाट आली तो [[काळ|कालखंड]] म्हणजे [[विष्णूदास भावे|विष्णूदास भावेंच्या]] कालखंडानंतर साधारणपणे १८६१ च्या१८६१च्या दरम्यान [[विद्यापीठ|विश्वविद्यालयाची]] स्थापना होऊन [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[इंग्रजी]] [[शिक्षण]] सुरू झाल्यावर त्या शिक्षणाने जे काही परिणाम झाले त्यातील एक म्हणजे लोकांची बुकिश नाटकाकडील प्रवृत्ती वाढली. [[महाविद्यालय|महाविद्यालयामध्ये]] [[विल्यम शेक्सपिअर|शेक्सपिअर]], [[कालिदास]] यांच्या नाटकाचा रसास्वाद जेव्हा उमजू लागला तस तसे इंग्रजी, [[संस्कृत]] नाटकाचे प्रयोग होऊ लागले. संस्कृत नाटकांची, इंग्रजी भाषेतील नाटकांची भाषांतरे होऊन [[पाश्चिमात्यीकरण|पाश्चिमात्य]] रीतीरिवाज, आचारविचार यांच्याकडे मराठी रंगभूमीचा ओढा वाढला. विद्वान मंडळींनी संस्कृत व इंग्रजी नाटकांची भाषांतरे किंवा रुपांतरे केली त्याचबरोबर स्वतंत्र नाटके मराठीत रचून नाटक मंडळींना शिकवली याचा मराठी रंगभूमीला उपयोग झाला व सुधारणा झाली. बुकिश नाटकांकडे कल वाढविण्यास प्रामुख्याने ‘आर्योद्धारक नाटक मंडळी’ कारणीभूत आहे. ‘वेणीसंहार’, ‘ऑथेल्लो’, ‘तारा’, ‘किंगलियर’, शंकरराव पाटकर हे नट ‘ऑथेल्लो’ नाटकातील ‘यागोची’ व्यक्तिरेखा खूप कमालीची करीत.
बुकिश नाटकापासून पडदे, [[पोशाख]], देखावे वैगरे या बाबतीत खूपच सुधारणा झाल्या. बुकिश नाटकासंबंधाने सर्वात चांगले नाव मिळवलेली नाटक मंडळी म्हणजे ‘शाहूनगरवासी’ हीच होय. ‘त्राटिका’ हे नाटक शेक्सपिअरच्या ‘टेमिंग ऑफ धी श्र्यू’ या नाटकाच्या आधारावर रचलेले आहे. विनोदी व हास्यपूर्ण आहे. प्रोफेसर वासुदेवराव केळकर व शंकर मोरो रानडे यांच्या साह्याने ही मंडळी बुकिश नाटकाचे प्रयोग करीत असे. [[सामाजिक समूह|सामाजिक]], [[इतिहास|ऐतिहासिक]] नाटकेसुद्धा या दरम्यान रंगभूमीवर आली. मराठीतील स्वतंत्र नाटकांना सुरुवात झाली ती सामाजिक नाटकापासून. गोविंद ना. माडगावकर यांनी आपले ‘व्यवहारोपयोगी नाटक’ १८५९ साली प्रसिद्ध केले. स्वतंत्र पहिले ऐतिहासिक नाटक म्हणून ‘[[थोरले माधवराव पेशवे]]’ याचा उल्लेख करावा लागेल. वि. ज. कीर्तने यांनी १८६१ साली हे लिहिले. बुकिश नाटकांनी मराठी रंगभूमीवर गद्य नाटके समृद्ध केली.
ओळ ४९:
[[विष्णूदास भावे|विष्णूदास भाव्यांनी]] ज्या काळात [[सीतास्वयंवर (इ.स. १८४३ नाटक)|सीतास्वयंवर]] हे नाटक रचले, त्या काळी मराठी प्रांतात लोकरंगभूमीचे विविध प्रकार दिसून येत होते. धार्मिक ग्रंथांची प्रवचने, त्यातील कथानकांवर आधारित [[कीर्तन|कीर्तने]], [[कोकण|कोकणाकडचा]] [[दशावतारी नाटक|दशावतार]], [[कन्नड भाषा|कानडी भाषेतले]] [[यक्षगान]], भागवतमेळे, वर्षभरातले विविध व्रतवैकल्ये, [[सण]], समारंभ, बारसे, [[विवाह]], अत्यंसंस्कार असे विविध विधी ह्याने सगळे सांस्कृतिक वातावरण भरलेले-भारलेले होते. काही धार्मिक प्रसंगी, विशेषतः [[दसरा|दसऱ्याच्या]] दिवशी सोंग काढण्याची परंपरा अनेक ठिकाणी दिसून येते. इथे कथानक आणि [[संवाद]] हे घटक नसतात, पण व्यक्तिरेखा, [[वेशभूषा|वेषभूषा]], थोडे [[संगीत]], नाच हे नाटकातले घटक मात्र दिसून येतात. कथन परंपरेत [[पारायण]] – [[प्रवचन]] – कीर्तन असे विविध टप्पे दिसून येतात.
 
पारायणात वाचन असते, प्रवचनाच वाचनासोबत थोडे समजावूनसमजाऊन सांगितले जाते, तर कीर्तनात समजावूनसमजाऊन सांगणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतं की त्यासाठी संगीत आणि [[अभिनय]] हे घटक वापरले जातात. कीर्तनातील गेय काव्य आणि त्याचं गद्य निरूपण ह्यात विष्णूदासांच्या नाटकाचे मूळ आढळतं, शिवाय होनाजी बाळांच्या शाहिरी काव्याचा विष्णूदासांना परिचय होताच. त्यामुळे हे सगळे प्रभाव विष्णूदासी नाटकांवर दिसून येतात.
 
भारत त्या काळात एक ब्रिटिश [[वसाहती साम्राज्य|वसाहत]] असल्यामुळे अनेक ब्रिटिश सैनिक अधिकारी भारतात रहात होते. त्यांच्या [[मनोरंजन|मनोरंजनासाठी]] तत्कालीन ब्रिटिश नाटक मंडळ्या भारतात येऊन प्रयोग सादर करत असत. त्यातील काही नाटके शेक्सपिअरची तर काही तत्कालीन ब्रिटिश नाटककारांची होती. त्यांची मंचनाची पद्धत मात्र शेक्सपिअर कालीन नसून त्याच काळातली असल्यामुळे ही नाटके कमानी मंचाच्या पद्धतीची होती.ह्या नाटकांचे प्रयोग होण्याकरिता ब्रिटिशांनी भारतात काही कमानी-मंच नाटकघरे उभारली. ही नाटके पहायला ब्रिटिश अधिकाऱ्यांसोबतच प्रतिष्ठित धनिक तसेच ब्रिटिशांची चाकरी करणाऱ्या भारतीयांना आमंत्रण असे. अशा प्रकारे त्या काळात [[युरोप|युरोपात]] ज्या पद्धतीने नाटक सादर होत असे, त्या पद्धतीचा परिचय महाराष्ट्रातील जनतेला झाला.