"ममता बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: कॉंग्रेस → काँग्रेस (11) using AWB
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ५२:
 
===तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना===
[[इ.स. १९९३]] नंतर चार वर्षांनी थेट काँग्रेसपासून फारकत घेत नव्या राजकीय पक्षाची त्यांनी निवडणूक आयोगाच्या दरबारी नोंदणी केली आणि [[इ.स. १९९८]] मध्ये 'तृणमूल काँग्रेस' हा पक्ष अवतरला. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर [[इ.स. १९९८]] ते [[इ.स. २००१]] या कालावधीत त्यांनी भाजपप्रणीत एनडीए सरकारला पाठिंबा दिला. तर [[इ.स. २००१]] च्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांत त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली. [[इ.स. १९९१]] ते [[इ.स. २००१]] या कालावधीत दोनदा, आणि [[इ.स. २००४]] मध्ये काही काळ त्यांनी रेल्वेमंत्रीपद भूषवले. त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा पार धुव्वा उडाला... लोकसभेत त्या तृणमूलच्या एकमेव खासदार होत्या. [[इ.स. २००५]] मधील कोलकाता महापालिका निवडणुकीतही तृणमूलचे पानिपत झालं होते. अशा अपयशांचा सामना करतानाही पश्चिम बंगालमधील डाव्यांची सत्ता उलथून टाकण्याची जिद्द त्यांनी सोडली नाही.
 
[[इ.स. २००६]] ते [[इ.स. २०११]] हा काळ बंगालसाठी कमालीचा अस्वस्थ, अशांत ठरला. याच काळात तृणमूलच्या भावी सत्तेची बीजे रोवली गेली. [[इ.स. २००६]] च्या नोव्हेंबरमध्ये शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात नारा देत [[सिंगूर]] येथे उभारण्यात येणाऱ्या 'टाटा मोटर्सच्या नॅनो कार' प्रकल्पाला त्यांनी विरोध दर्शवला. त्यासाठी संपादित केलेल्या एक हजार एकर जमिनीपैकी ४०० एकर जमीन शेतकऱ्यांना परत द्यावी, या मागणीसाठी त्यांनी नेटाने आंदोलन केले. २५ दिवस त्यासाठी उपोषण केले. अखेर [[इ.स. २००८]] मध्ये टाटांनी सिंगूरमधून माघार घेतली. शेतकऱ्यांशी थेट निगडित असलेल्या या प्रश्नाने ममतांना सामान्यांच्याजवळ नेले. तर पोलिसी बळाच्या अतिवापराने डाव्यांना लोकांपासून तोडले. त्यानंतर [[पंचायत]], [[महापालिका]], [[विधानसभा]], [[लोकसभा]], यांच्या पोटनिवडणुकींत ममतांना वाढते यश मिळत गेले. [[इ.स. २००९]] मध्ये केंद्रात स्वतः रेल्वेमंत्री बनत त्यांनी तृणमूलला सात मंत्रिपदे पदरात पाडून घेतली. गेल्या दोन वर्षांत धडाक्‍यात काम करीत बंगालमध्ये अनेक विकासकामे करीत डाव्यांना आम्ही चांगला पर्याय देऊ शकतो हे लोकांना कृतीतून पटवून दिले.
 
===विधानसभा निवडणूका===