"बाबूराव पेंटर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २९:
 
== जीवन आणि कार्य ==
१९३० च्या१९३०च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला. जे. जे. स्कूलमध्ये काहीही शिक्षण घेतलेले नसतानादेखील रंगांच्या शुद्धतेविषयी व मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. चित्रकलेतील त्यांचे तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन ते थोडेदेखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते एक कल्पनारम्य, उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करत. त्यांनी तयार केलेल्या [[महात्मा गांधी]], [[छत्रपती शिवाजी महाराज]] आणि [[महात्मा फुले]] यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘कलामहर्षी’ या पदवीने गौरवण्यात आलेल्या बाबूराव पेंटर यांनी १९५४ मध्ये जगाचा निरोप घेतला.
'''कलामहर्षी बाबुराव पेंटर :'''
कोल्हापूर येथील बाबुराव पेंटर यांच्या वडिलांचा व्यवसाय [[सुतारकाम]], [[लोहारकाम]] करणे हा होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच शिल्पकला, चित्रकला या कलांचे ज्ञान मिळत गेले. या कामात आनंदराव पेंटर या त्यांच्या आतेभावाचीदेखील त्यांना सोबत मिळाली. चित्रकला, शिल्पकला, [[चित्रपट]] अशा तीनही कलांमध्ये त्यांनी स्वतःचे असामान्य कौशल्य सिद्ध कले. शिल्पकलेच्या कामासाठी त्यांनी स्वतःची फॅक्टरी देखील सुरू केली होती. शिल्पकलेतील [[माती]]चे असो वा [[धातू]]चे [[ओतकाम]] असो, बाबुराव स्वतः ही कामे करत. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांनी तयार केलेली शिल्पे कोल्हापूरमध्ये आजही पाहण्यास मिळतात.