"पहिले चीन–जपान युद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २७:
'''पहिले चीन–जपान युद्ध''' प्रामुख्याने [[कोरिया]]च्या अधिपत्यावरून [[चीन]] व [[जपान]] ह्या राष्ट्रांदरम्यान १८९४-९५ साली लढले गेले. सहा महिने चाललेल्या ह्या युद्धात जपानने सातत्याने विजय मिळवले व अखेर फेब्रुवारी १८९५ मध्ये चीनने सपशेल शरणागती पत्कारली. ह्या पराभवामुळे चीनमधील [[छिंग राजवंश]]ाची जगभर नाचक्की झाली व त्याचवेळी [[पूर्व आशिया]]मधील प्रादेशिक वरचष्मा प्रथमच चीनकडून जपानकडे आला.
 
१८६८ सालच्या जपानमधील [[मैजी पुनर्स्थापना|मैजी पुनर्स्थापनेनंतर]] जपानची झपाट्याने प्रगती व आधुनिकीकरण होत होते. अनेक शतकांचे एकाकी राहण्याचे धोरण बदलून जपानने जागतिक घडामोडींमध्ये लक्ष घालण्यास सुरुवात केली व त्याचसोबत [[साम्राज्यवाद]]ाचा देखील अंगिकार केला. तुलनेत शेजारील [[कोरिया]] देश मागासलेलाच राहिला होता. जपानला कोरियावर दुसऱ्या महासत्तेचे नियंत्रण नको होते व कोरियामधील नैसर्गिक संपत्तीवर व कृषी उत्पन्नावर जपानचा डोळा होता. पारंपारिक काळापासून कोरियामधील [[चोसून]] राजवंशावर चीनचा अंमल होता. १८८० च्या१८८०च्या दशकामधील कोरियात घडलेल्या अनेक घटनांमुळे चीन व जपानमध्ये तणाव कायम राहिला.
 
जून १८९४ मध्ये [[सोल]]मधील एक बंडखोरी मोडून काढण्यासाठी कोरियन सरकारने चीनची मदत मागितली. चीनने ४,८०० सैनिक कोरियामध्ये धाडल्यामुळे खवळलेल्या जपानने ८,००० बळ असलेली एक सैन्य तुकडी सोलमध्ये धाडली व कोरियन राजाची सत्ता उलथवून लावून जपानी कळसुत्री असलेले सरकार स्थापन केले. नव्या सरकारने कोरिया-चीन दरम्यानचे सर्व करार रद्द केले व जपानला चीनी सैन्याला कोरियामधून हाकलून लावण्याची परवानगी दिली. अखेर २५ जुलै १८९४ रोजी युद्धास सुरुवात झाली. सरस व आधुनिक जपानी पायदळ व आरमारापुढे अविकसित छिंग सेनेचा टिकाव लागला नाही. १७ एप्रिल १८९५ रोजी चीन व जपानदरम्यान तह झाला ज्यामध्ये चीनने कोरियाला संपूर्ण स्वातंत्र्य मंजूर केले व आपला बराचसा भूभाग जपानच्या स्वाधीन केला.