"ज्योती बसू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ४५:
 
== राजकीय प्रवास ==
कम्युनिस्ट पार्टी ऑफ ग्रेट ब्रिटन'चेही ते सदस्य होते. कायद्याची पदवी घेऊन भारतात परतल्यानंतर बसू यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाला पूर्णवेळ वाहून घेतले. १९४४ ला१९४४ला बसू ट्रेड युनियनमध्ये कार्यरत झाले. १९४६ च्या१९४६च्या निवडणुकांत काँग्रेसचे उमेदवार हुमायुन कबिर यांचा रेल्वे मतदारसंघातून पराभव करून बसू यांनी राजकीय पटलावर प्रवेश केला. स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्ट पाटीर्वर बंदी आणल्यानंतर ते भूमीगत होते. बंगालमध्ये ट्रामचे भाडे वाढवल्याच्या विरोधात आंदोलन केल्यामुळे त्यांना अटकही झाली होती. १९५२ च्या१९५२च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी बसूंना बरनगोरे मतदारसंघातून राय हरेंदनाथ चौधरी यांच्या विरोधात निवडून दिले. १९६७ आणि १९६९ मध्ये बसूंनी पश्चिम बंगालचे उपमुख्यमंत्रीपद सांभाळले. त्यानंतर आठ वर्षांनी ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बनले. ही धुरा त्यांनी सलग २३ वषेर् सांभाळली. बसूंच्या ६० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीदीर्त अनेकदा त्यांचे राजकीय कौशल्य पणाला लागले होते. १९८० मध्ये त्यांनी काँग्रेसेतर मुख्यमंत्र्यांची बैठक कोलकातात घेतली होती. केंदातील काँग्रेस सरकारच्या धोरणांच्या विरोधात देशांतील मुख्यमंत्र्यांना एकत्र आणण्याचा तो प्रयत्न होता. १९८५ मध्येही दाजिर्लिंगमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान राजीव गांधी यांना हिल कौन्सिल स्थापन करण्याचा सल्ला दिला होता. कम्युनिस्ट पक्षात असूनही बसू यांनी इतर मतांबद्दल दुराग्रह ठेवला नाही, हे त्यांचे मोठेपण. २००४ मध्ये काँग्रेससह यूपीए सरकार स्थापन करण्यात बसू यांचा मोलाचा वाटा होता. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान होण्याची संधी त्यांच्याकडे चालत आली होती. मात्र आपल्या पक्षाची शिस्त आणि दुराग्रहाखातर त्यांना पंतप्रधानपदावर पाणी सोडावे लागले होते. राजकीय कामकाजात इंदिरा गांधींपासून नरसिंह रावांपर्यंत सर्व पंतप्रधान त्यांचा सल्ला घेत असत. १९७०मध्ये ज्योती बसू यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, मात्र त्यातून ते बचावले. 'कम्युनिस्ट कधीच रिटायर होत नाहीत', असे म्हणत आयुष्याच्या शेवटापर्यंत कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला. मात्र गेली काही वर्षे ते राजकारणापासून दूर होते. १९८७ मध्ये देशातील प्रमुख इंग्रजी दैनिकांनी केलेल्या निरीक्षणात सर्वाधिक 'इमानदार' म्हणून ज्योती बसू यांची निवड झाली होती. त्यांची गणना [[लालबहादूर शास्त्री]] आणि [[जवाहरलाल नेहरू]] अशा नेत्यांमध्ये होऊ शकते, असे मत वृत्तपत्रांनी व्यक्त केले होते. त्यांचे विरोधकदेखील त्यांना योग्य आणि व्यावहारिक प्रशासक मानत. ज्योती बसू पश्चिम बंगालमध्ये असताना तेथे काँग्रेस सत्तेवर येऊच शकत नाही, असे खुद्द काँग्रेस नेतेच म्हणत.
 
== योगदान ==