"चंद्रग्रहण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २:
[[चित्र:Geometry_of_a_Lunar_Eclipse.svg|उजवे|इवलेसे|300px|चंद्रग्रहण]]
[[चित्र:Lunar eclipse optics.jpg|उजवे|इवलेसे|300px|चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र नारंगी दिसण्याचे प्रकाश परिवर्तन]]
जेव्हा [[पृथ्वी]] ही [[सूर्य]] व [[चंद्र]]ाच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने '''चंद्रग्रहण''' दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णतः वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. चंद्रग्रहण साधारणपणे [[पौर्णिमा|पौर्णिमेच्या]] आसपास दिसते. चंद्रग्रहण प्रत्येक पौर्णिमेस लागत नाही, कारण चंद्रकक्षा व क्रांतिवृत समपातळीत नसून त्यांच्या पातळयांमध्ये ५ अंशांचा ९' चा कोन आहे.
चंद्रग्रहणे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसतात. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एका प्रतलात आल्यावर चंद्रग्रहण होते. पृथ्वीपेक्षा सूर्याचा आकार बराच मोठा असल्यामुळे पृथ्वीची अवकाशात गोलाकार मुख्य गडद छाया आणि त्या भोवती फिकट उपछाया अस्तित्वात असते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीतून प्रवास झाला, तर खग्रास किंवा खंडग्रास चंद्रग्रहण दिसते. चंद्राचा पृथ्वीच्या गडद सावलीभोवतीच्या फिकट सावलीतून प्रवास झाला, तर छायाकल्प चंद्रग्रहण दिसते. उपछाया चंद्रग्रहणाच्या वेळी पौर्णिमेच्या तेजस्वी चंद्राचा प्रकाश काहीसा मंदावलेला दिसतो. चंद्रावर पृथ्वीची गडद छाया पडणार नसल्यामुळे डोळ्यांना हे ग्रहण विशेष जाणवत नाही.