"ख्रिश्चन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २:
{{ख्रिश्चन धर्म}}
{{बदल}}
'''ख्रिस्ती धर्म''' किंवा '''ख्रिश्चन धर्म''' हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा धर्म असून त्याला जवळजवळ दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. [[पॅलेस्टाईन]] (सध्याचा [[इस्रायल]] देश) येथील बेथलहेम येथे ख्रिस्ती धर्माचा प्रारंभ झाला. [[येशू ख्रिस्त]] हा या धर्माचा संस्थापक मानला जातो. ख्रिस्तपूर्व ४ ते ६ च्या६च्या दरम्यान येशूचा जन्म बेथलेहम या गावी झाला.ख्रिस्ती शकारंभी बलाढ्य [[रोमन साम्राज्य]] [[अटलांटिक महासागर|अटलांटिक महासागरापासून]] [[तुर्कस्तान]] पर्यंत व जर्मन समुद्रापासून [[सहारा वाळवंट |सहारा वाळवंटापर्यंत]] पर्यंत पसरले होते. पॅलेस्टाईन हा या रोमन साम्राज्यातील एक सुभा होता. योग्य वेळ आली तेव्हा गालील प्रांतातील बेथलेहम या गावी येशूचा जन्म झाला. त्या वेळी पॅलेस्टाईन देशावर रोमन सत्ता अधिकार गाजवीत होती. सम्राट [[ऑगस्टस]] हा या साम्राज्याचा सम्राट होता. त्याने गालील प्रांताचा मांडलिक राजा म्हणून हेरोद राजाला नेमले होते. याच्याच अमदानीत येशूचा जन्म झाला. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्त यांनी केली हा धर्म जगभर पसरलेला आहे येशू ख्रिस्तांच्या बारा शिष्यांपैकी एक असणारे [[सेंट थॉमस]] हे इसवी सनाच्या पहिल्या शतकात [[भारत|भारतातील]] [[केरळ|केरळमध्ये]] आले. त्यांनी थ्रिसुर जिल्ह्यातील पलयेर येथे इसवी सन ५२ मध्ये चर्चची स्थापना केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार नुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तीमान आहे येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानव जातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते. असे मानले जाते आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे अगदी शत्रूवर देखील चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्म सांगितले आहे. [[बायबल]] हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र [[धर्मग्रंथ]] आहे ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनाच स्थळाला चर्च असे म्हणतात.
<br>येशू (मूळ हिब्रू शब्द यहोशवा - यहोवा माझे तारण आहे.) या [[हिब्रू भाषा|हिब्रू]] नावाचा अर्थ तारणारा असा आहे. तर ख्रिस्त हा शब्द ख्रिस्तोस या [[ग्रीक]] शब्दापासून बनला आहे. त्याचा अर्थ अभिषिक्त केलेला असा होतो. ख्रिस्तोस हा शब्द मसीहा (म्हणजे तारणारा) या हिब्रू शब्दाचे ग्रीक भाषेतील रूपांतर आहे. येशू धर्माने यहुदी होता. वयाच्या २७ व्या वर्षी त्याने आपल्या शिकवणुकीला प्रारंभ केला. जवळपास तीन वर्ष त्याने आपली शिकवण संपूर्ण गालील प्रांतात व आजूबाजूच्या परिसरात प्रसारित केली. त्याने बारा प्रेषितांची निवड करून त्यांना आपले कार्य पुढे चालविण्यास प्रोत्साहन दिले. [[यहुदी]] धर्मानुसार (जुना करार) पापी मानवाच्या तारणासाठी परमेश्वराने तारणारा (मूळ हिब्रू शब्द मसीहा) पाठविण्याचे अभिवचन दिले होते. जुन्या करारात या मसीहाबद्दल अनेक भविष्ये वर्तविली गेली होती. येशू हाच तारणारा (मसीहा) आहे अशी ख्रिस्ताच्या शिष्यांची खात्री झाली होती. वयाच्या ३३ व्या वर्षी यहुदी धर्माधिकाऱ्यांनी त्याच्यावर धर्मद्रोहाचा व राष्ट्रद्रोहाचा आरोप करून तत्कालीन रोमन सत्ताधीशांच्या करवी त्याला क्रुसावर खिळवून ठार केले. परंतु मरणानंतर तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. त्याने आपल्या अनेक प्रेषितांना दर्शने दिली. व त्याची शिकवण जगभर प्रसारित करण्याची आज्ञा दिली. त्यांनंतर तो स्वर्गात गेला. असा ख्रिस्ती धर्मीयांचा विश्वास आहे. त्याच्या आज्ञेनुसार त्याच्या प्रेषितांनी ख्रिस्ती धर्माचा जगभर प्रसार केला. बायबल (जुना व नवा करार) हा ख्रिस्ती धर्माचा धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन धर्म हा लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात मोठा धार्मिक समुदाय आहे. ख्रिस्ती धर्मात तीन मुख्य पंथ आहेत. १. कॅथोलिक, २ ईस्टर्न ऑर्थोडॉक्स, ३. प्रोटेस्टंट पंथ . या पंथांतही (विशेषतः प्रोटेस्टंट पंथात) [[प्रेस्बिटेरियन]], कॅल्व्हिनिस्ट आदी अनेक उपपंथ आढळतात. आज जगभरामध्ये ख्रिस्ती धर्मीय लोकांची संख्या खूप मोठी आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतातही ख्रिश्चन मिशनरी यांनी मोठ्या प्रमाणात या धर्माचा प्रसार आणि प्रचार भारतामध्ये केला त्यातून भारतामध्ये हा धर्म मोठ्या प्रमाणात वाढला आज भारतामध्ये ख्रिस्ती धर्मीय लोकांची संख्या ही विशेष आहे मानवता धर्माची शिकवण याही धर्मामध्ये दिली जाते {{संदर्भ हवा}}
 
ओळ २९:
== भारतातील ख्रिश्चन ==
[[चित्र:Nasrani cross.jpg|thumb|नसरानी cross]]
२०११ च्या२०११च्या जनगणनेनुसार भारतात ख्रिश्चन धर्म हा तिसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. ख्रिस्तीधर्मीय भारताच्या लोकसंख्येच्या २.३ टक्के आहेत. भारतात या धर्माचे आगमन [[संत थॉमस]] याच्या येण्यानंतर झाले. भारताच्या ४ राज्यांत ख्रिश्चन हे बहुसंख्याक आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-05-21|title=भारत में धर्म|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE&oldid=4195955|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
इस्लाम, ख्रिस्ती आणि ज्यू या तिन्ही धर्माचा भारतीय उपखंडातील प्रवेश दक्षिण भारतातील केरळ प्रांतातून झाला. येशू ख्रिस्ताच्या बारा प्रत्यक्ष शिष्यांपकी सेंट थॉमस ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने केरळच्या किनारपट्टीवरील मुझिरिस म्हणजे सध्याचे कोडुंगलूर येथे इ.स. ५२ मध्ये आला. त्याच्या तिथे येण्यापूर्वी काही ज्यू लोक आधीच त्या भागात स्थायिक झाले होते. थॉमसने त्या भागातील पालायार, कोडुंगलूरवगरे आठ ठिकाणी चच्रेस स्थापन करून ख्रिस्ती धर्मप्रसाराची केंद्रे सुरू केली. इ.स. ७२ मध्ये चेन्नईजवळच्या सध्याच्या सेंट थॉमस माऊंट येथे त्याची हत्या झाली.