"अजित कडकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १३०:
अजितजींच्या संगीत प्रवासात त्यांना सर्वाधिक साथ देऊन विविध सांगीतिक रचनांचा मेरुमणी रचणारे संगीतकार ठरले ते '''नंदूजी होनप'''... प्रवीण दवणेंच्या रचनांना नंदू होनप यांच्या संगीताचा आणि अजित कडकडेंच्या सुरांचा परिसस्पर्श झाल्यावर काय चमत्कार होऊ शकतो याचा दिव्य अनुभव महाराष्ट्राने १९८७ साली घेतला. निमित्त होतं '''<nowiki/>'दत्ताची पालखी'<nowiki/>''' अल्बम रिलीज होण्याचं. '''१२ फेब्रुवारी १९८७''' रोजी 'दत्ताची पालखी' हा अल्बम रिलीज झाला. T series म्युझिक कंपनीने हा अल्बम काढला.  यात एकूण आठ दत्तभजनं आहेत, पैकी चार अजितजींनी गायली आहेत तर चार अनुराधा पौडवाल यांनी गायली आहेत. या आठही रचना शब्दबद्ध केल्या आहेत प्रसिद्ध कवी, लेखक प्राध्यापक '''प्रवीणजी दवणे''' यांनी तर संगीतबद्ध केल्या आहेत '''नंदूजी होनप''' यांनी. हा अल्बम इतका प्रचंड गाजला की भक्तीगीत गायक म्हणून प्रसिद्ध झालेले अजितजी भक्तीगीत गायनात सुद्धा '''‘दत्त आणि स्वामी समर्थांची भजनं'''' गाणारे म्हणून सर्वमान्यता पावले. अजितजींना सर्वाधिक लोकप्रियता दत्तभजनांनीच मिळवून दिली.
 
प्रवीणजी दवणे गीतकार, नंदूजी होनप संगीतकार आणि अजित कडकडे गायक असं हे 'दत्ताची पालखी' अल्बमच्या निमित्ताने एकत्र आलेलं त्रिकुट. या त्रिकुटाने 'दत्ताची पालखी' अल्बम नंतर जवळपास ३०-३२ वर्षे एकत्र काम करून इतके अचाट सांगीतिक विक्रम केले की त्यांची तोडच नाही. दत्तप्रभू, गणपती, शेगावचे श्री. गजानन महाराज, शिर्डीचे साई बाबा, अक्कलकोटचे श्री. स्वामी समर्थ या आणि अशा कित्येक देव-देवता-संतांवर या त्रिकुटाने रचना लिहून-संगीतबद्ध आणि सुरबद्ध करून त्या अल्बमच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या. अजितजींचे विविध संगीतकारांनी संगीतबद्ध केलेले सर्व अल्बम जवळपास साडेतीनशेच्या आसपास जातील. आणि नंदू होनप (संगीतकार), प्रवीण दवणे (गीतकार) आणि स्वतः अजितजी (गायक) असे तिघांनी निर्मिलेले अल्बमच जवळपास अडीचशे च्याअडीचशेच्या घरात पोचतील.
 
याशिवाय '''विलासबुवा पाटील''' यांनीही त्यांच्या उत्कृष्ट सांगीतिक नियोजनाने अजितजींकडून अनेक अभंग आणि गौळणी गाऊन घेतल्या. विलासबुवा पाटील हेही उत्तम संगीतकार होते. '''"लंगडा गं लंगडा लंगडा गं लंगडा देव एका पायाने लंगडा, असा कसा असा कसा असा कसा असा कसा देवाचा देव बाई ठकडा"''' ही अजितजींनी '''<nowiki/>'तोडी'''' रागावर आधारित गायलेली गौळण सुद्धा विलासबुवांनीच संगीतबद्ध केलेली आहे. याशिवाय '''"डोळे मोडीत राधा चाले", "झोली भरकर लाना", "बोलो हरि बोलो", "खेती करो हरि नाम की", "जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं", "वेढा रे पंढरी", "मुरली मनोहर रे", "भुलविले वेणू नादे", "पाहिला सखा पांडुरंग", "पंढरीचा निळा लावण्ण्याचा पुतळा", "खायेबा साखर लोणी माझ्या बाळा", "ओम गणनाथ गणपती", "नमोस्तुते नारायणी नमोस्तुते", "अवधूत म्हणजे आकाशासारिखा", हनुमंत महाबळी''' '''रावणाची दाढी जाळी", "कैसे वेड लाविले या हरि ने", "नाम तुझे बरवें गा शंकरा", "जे शंभूने धरिले मानसी तेचि उपदेशिले गिरिजेसी", "धन्य जे ऐकती शिवरात्रीची कथा", "किती बेलाची आवडी", "पावला प्रसाद आता उठोनि जावें"''' यांसारख्या असंख्य गौळणी-अभंग-कबीर भजनं विलासबुवांनी संगीतबद्ध केली आहेत जी अजित कडकडेंनी गायली.
ओळ १८३:
२) अनेक मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा अजितजींनी पार्श्वगायक म्हणून काम केले आहे. '''<nowiki/>'तोचि एक समर्थ', 'आई पाहिजे', 'गोष्ट धमाल नाम्याची'''' यांसारख्या चित्रपटांमध्ये अजितजींनी गायलेली गाणी खूप गाजली आहेत. '''"गुरूविण नाही दुजा आधार", "अलौकिक दत्तात्रेय अवतार"''', यांसारखी त्यांची अनेक गाणी गाजली.
 
३) दूरदर्शनवर (DD.National) लागणाऱ्या '''<nowiki/>'भारत एक खोज'<nowiki/>''' नामक कार्यक्रमात '''<nowiki/>'महाकवी कालिदासाच्या'''' भागांमध्ये अजितजींनी पार्श्वगायन केले आहे. यात महाकवी कालिदासाच्या तोंडी असलेली पदे अजितजींनी गायली आहेत. किंबहुना कालिदासाचा गातानाचा आवाज अजित कडकडेंचाच आहे. '''"ये कँधेपर कसा मैल कान्होबा नाकान्होबाना वल्कल", "दूर जाकर भी न तुम मेरे हृदय से दूर हो सकती", "मदिरनयनी"''' यांसारखी एकापेक्षा एक दर्जेदार पदे अजितजींनी गायली आहेत.
 
४) संत कबीर, संत मीराबाई, संत ब्रह्मानंद यांची हिंदी भजनं सुद्धा अजितजींनी अगदी शास्त्रीय पद्धतीने गायलेली आहेत. त्यांच्या चलचित्रफिती युट्युबवर उपलब्ध आहेत. एकूण आठ भजनं युट्युबवर अजितजींच्या आवाजातली आहेत. युट्युबवर '''<nowiki/>'Bhaktimala Bhajan by Ajit Kadkade'''' असं शोधल्यास या भजनांच्या चलचित्रफिती आपल्यासमोर येतील. एक एक भजन दहा दहा मिनिटे सुंदर आळवून स्वरबद्ध केलं आहे.