"चाफेकर बंधू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७:
 
== जन्म आणि वैयक्तिक आयुष्य ==
[[File:Revolutionary,_Damodar_Hari_Chapekar.jpg|thumb|[[दामोदर हरी चाफेकर]]]]
[[File:Revolutionary, Balkrishna Chapekar.jpg|thumb| [[बाळकृष्ण हरी चाफेकर]]]]
[[File:Revolutionary, Vasudeo Chapekar.jpg|thumb|[[वासुदेव हरी चाफेकर]]]]
 
वासुदेव चाफेकरांचा जन्म [[इ.स. १८८०|१८८०]] मध्ये [[ चिंचवड]] मध्ये एका [[चित्पावन ब्राह्मण]] कुटुंबात झाला. त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. कालांतराने ते पुण्यातील चिंचवड येथे स्थायिक झाले. वडील ‍हरिपंत हे पुणे व मुंबई येथे हरिकथा सांगायचे. बालवयात तिघेही भाऊ [[कीर्तन|कीर्तनात]] वडिलांना मदत करायचे. त्यांमुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला.{{संदर्भ हवा}}
 
वासुदेव चाफेकर यांनी दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या त्यांच्या बंधूंसह राजकारणात आणि क्रांतिकारी कारवायांमध्ये भाग घेतला. त्यांनी भारतीय तरुणांना शस्त्रांचे प्रशिक्षण दिले.{{तारीख}}{{संदर्भ हवा}}
 
== प्लेग ची साथ ==
[[पुणे|पुण्यातील]] राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन हे भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे वळले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध [[लोकमान्य टिळक|टिळकांनी]] [[केसरी|केसरीमधून]] घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती. या आवाहनाने तीनही भाऊ प्रेरित झाले. त्यांनी लोकसंघटन केले. याचवेळी पुण्यात प्लेगच्या साथीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केल्याने ब्रिटिशांनी [[वॉल्टर चार्ल्स रँड]] ला भारतात पाचारण केले. रॅंडने रोग निवारण करण्याच्या उपायांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. हे करताना त्याने सामाजिक पायदंड पायदळी तुडवले. जसे की लोकांची घरे उपसून जाळणे, देवघरात जाऊन देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली महिलांशी अभद्र वर्तन करणे, कर्त्या पुरुषांना नामर्दाप्रमाणे हीन वागवणे. यामुळे चाफेकर बंधूच्या मनात [[ब्रिटिश|ब्रिटिशाविरुद्ध]] तिरस्कार निर्माण झाला. या साऱ्यांचा सूड घेण्याची योजना त्यांनी तयार केली.{{तारीख}}