"सय्यद किरमाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३९:
किरमाणी यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील २७५ सामन्यांत ३६७ झेल व ११२ यष्टिचीत अशी कामगिरी नोंदविली. त्यांच्या नावावर एक कसोटी बळीही आहे.
 
फारूख इंजिनियर यांच्यानंतर किरमाणी यांनी भारतीय संघात यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळली. १९७६मध्ये न्यू झीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या किरमाणी यांनी भारताच्या बड्या स्पिनर्सच्या गोलंदाजीवर कठीण प्रसंगी नेटाने यष्टिरक्षण केले. आपल्या दशकभराच्या कारकीर्दीतकारकिर्दीत त्यांची ऊर्जा आणि मैदानावरील वावर लक्षणीय असे. खालच्या क्रमांकावर फलंदाजीस येऊनही त्यांनी दोन कसोटी शतके झळकावली.
 
१९८१-८२मधील भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या सलग तीन कसोटींमध्ये किरमाणी यांनी एकही बाय दिला नव्हता. १९८३च्या वर्ल्डकपमध्ये टनब्रिज वेल्स येथील झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत किरमाणी यांनी कपिल देवसह नाबाद १२६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली होती. त्यावेळी बलाढ्य समजल्या जाणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या सहाव्या कसोटीत किरमाणी यांनी सुनील गावसकर यांच्यासह नवव्या विकेटसाठी रचलेली नाबाद १४३ धावांची भागीदारीही खास ठरली होती. त्यावेळी गावसकर यांनी नाबाद २३६ धावा केल्या होत्या. तेव्हा एखाद्या भारतीयाने विंडीजविरुद्ध केलेली ती सर्वोच्च खेळी ठरली होती.