"श्रीपाद वल्लभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ ६:
इ.स. १३२० मध्ये दत्तात्रेयांनी श्रीपाद वल्लभ म्हणून जन्म घेतला, असे मानले जाते. श्रीपाद वल्लभांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. त्यांना अलौकिक बुद्धिमत्ता लाभली होती. आपल्या भावंडांमधील अपंगत्व दूर करून त्यांनी माता-पित्यांची चिंता दूर केली. त्यांनी जगन्नाथपुरी, काशी, बदीकेदार या तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. तीन वर्षे ते गुप्तपणे गोकर्ण-महाबळेश्वर येथे राहिले. त्यानंतर ते श्रीशैलावर गेले. त्यांनी संन्यास घेतला नव्हता. ते बहुधा अवधूत वेशाने राहत असावेत.
 
समाजातील विकृती नाहीशी व्हावी, परकीय आक्रमणाने गांजलेली, विस्कळीत आणि दुर्बल झालेल्या समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापनापुनःस्थापना व्हावी, या उद्देशाने दत्तात्रेयांनी हा अवतार घेतला, असे मानले जाते.
 
श्रीपाद वल्लभांच्या अवतारानंतरच भारतामध्ये दत्त संप्रदायाची जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे.