"शोले (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ ४७:
गब्बरसिंग हा ठाकुराच्या रामगढ या गावाच्या जवळपासच्या गावात आपल्या दहशतीच्या जोरावर गावकऱ्यांकडून पाहिजे तशी खंडणी वसूल करत असतो. गब्बरसिंगाला ठाकुराने एकदा पकडलेले असते व त्याचा सूड उगवण्यासाठी म्हणून गब्बरसिंग ठाकुराच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारतो व ठाकुराचे दोन्ही हात छाटून टाकतो. तेव्हापासून ठाकुर आपले हात शाल पांघरून सतत झाकून ठेवीत असतो. गब्बरसिंग कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकत असल्याने त्या परिसरात गब्बरसिंगाबद्द्ल गावकऱ्यांच्या मनांत जबरदस्त दहशत असते. आया आपल्या मुलांना गब्बरसिंग येईल असे सांगून झोपवत असत. गब्बरसिंगाच्या टोळीत अनेक जण होते. कालिया, सांभा यांसारखे लोक गब्बरसिंगाच्या आदेशावर कोठेही जाऊन धुमाकूळ घालत. एकदा कालिया व अन्य काही डाकू रामगढात येऊन धान्याची खंडणी मागतात. काही गावकरी खंडणी देतात; परंतु ठाकुर कोणताही गावकरी गब्बरसिंगाला खंडणी देणार नाही, असे कालियाला ठणकावून सांगतात व आता रामगढाच्या सुरक्षेसाठी दोन शूर शिलेदार आले आहेत असा इशारा देतात. जय व वीरू दोघेही चांगले नेमबाज असतात. त्यामुळे कालियाला परतावे लागते.
 
इकडे कालिया आपल्या इतर दोन साथीदारांसह रिकाम्या हातांनी परत आल्यामुळे गब्बरसिंगाचा राग अनावर होतो व असे होणे त्याच्या दबदब्याच्या दृष्टीने घातक असते. या अपयशाची शिक्षा म्हणून गब्बरसिंग कालिया व इतर दोघांना ठार मारतो. या प्रसंगादरम्यान घडणारा संवाद हिंदी चित्रपटसृष्टीतील एक इतिहास बनला आहे. गब्बरसिंग स्वत:स्वतः डाकूंची टोळी घेऊन रामगढावर होळीच्या दिवशी हल्ला करायचे ठरवतो.
 
ठरवल्याप्रमाणे गब्बरसिंग होळीच्या दिवशी गावात सण साजरा होत असताना हल्ला करतो. गब्बरसिंगाचे साथीदार व जय-वीरू यांच्यामध्ये जोरदार चकमक झडते. गब्बरसिंग जयाला ओलीस ठेवतो व सर्वांना शस्त्रे खाली टाकायला सांगतो. जय स्वतःहून गब्बरसिंगापुढे झुकत असल्याचे दाखवत असतानाच गब्बरसिंगाच्या डोळ्यांत धूळ टाकून पारडे आपल्या बाजूस वळवतो व पाहता पाहता जय आणि वीरू गब्बरसिंगाला पळवून लावतात. परंतु या धुमश्चक्रीत प्रत्यक्ष मदत न केल्याबद्दल वीरू ठाकुरावर चिडतो. तेव्हा ठाकुर गब्बरसिंगाने आपले हात छाटल्याचे उघड करतो. जय-वीरू यांच्या मनांत ठाकुराबद्दलचा आदर दुणावतो.
ओळ ६१:
वीरू व गावातील अनेक साथीदार तोवर येतात. पण जय अखेरचे श्वास मोजत असतो. जय वीरूच्या कुशीत आपला जीव सोडतो. चिडलेला वीरू गब्बरसिंगावर चालून जातो व गब्बरसिंगाचे उरलेले साथीदार लोळवून गब्बरसिंगाला मार-मार मारतो. तो गब्बरसिंगाला जिवानिशी मारणार, इतक्यात ठाकुर दिलेल्या वचनाची आठवण करून देतो व गब्बरसिंगाला त्याच्यासाठी जिवंत सोडण्याची मागणी करतो. जयाने दिलेल्या वचनाखातर वीरू गब्बरसिंगाला ठाकुराच्या हवाली करतो. ठाकुर हात नसले, तरी खास खिळे असलेल्या जोड्यांनी गब्बरसिंगाला पुन्हा मार मार मारतो व शेवटी पोलीस येऊन हस्तक्षेप करतात व गब्बरसिंगाला अटक करतात.
 
चित्रपटाच्या शेवटी जयाच्या चितेला अग्नि देऊन वीरू एकटा परत चाललेला असतो व त्या वेळेस उद्विग्न वीरूला ठाकुर बसंतीचा हात देतात व दु:खीदुःखी वीरूचे हास्य परत येते.
 
==त्रिमीतीत आवृत्ती (3डी ) ==