"चेकोस्लोव्हाकिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
 
ओळ २७:
|लोकसंख्या_घनता = १२२
}}
'''चेकोस्लोव्हाकिया''' (47° 44' N to 51° 3' N, 12° 5' E to 22° 34' E) (चेक, स्लोवाक:स्लोवाकः Československo चेस्कोस्लोवेन्स्को) हा [[मध्य युरोप|मध्य युरोपातील]] पूर्वेकडचा एक सार्वभौम देश होता. त्यात [[बोहेमिया]], [[मोरेविया]] व [[सायलेशिया]] आणि [[स्लोवाकिया]] यांचा समावेष होता. [[ऑस्ट्रिया-हंगेरी]] साम्राज्याचा भाग असलेला हा प्रांत १९१८ मध्ये स्वतंत्र झाला आणि १ जानेवारी १९९३ रोजी या देशाची [[चेक प्रजासत्ताक]] व [[स्लोवाकिया]] ह्या दोन देशांमध्ये फाळणी झाली.
 
चेकोस्लोव्हाकिया देश भूवेष्टित देश होता, याच्या पूर्वेस [[सोवियेत संघ]], उत्तरेस [[पोलंड]], नैऋत, पश्चिम आणि वायव्येस [[जर्मनी]] तर दक्षिणेस [[हंगेरी]] या देशांच्या सीमा लागून होत्या. जर्मनीमार्गे [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्राला]] मिळणारी [[एल्ब नदी]] बोहेमिया भागात, पोलंडमार्गे [[बाल्टिक समुद्र|बाल्टिक समुद्राला]] मिळणारी [[ओडर नदी]] मोरेवियाच्या उत्तर भागातून वाहणारी तर देशाच्या मध्य भागातून [[काळा समुद्र|काळ्या समुद्राला]] मिळणारी [[डॅन्यूब नदी]] या चेकोस्लोव्हाकियाच्या प्रमुख नद्या होत्या.