"शांताबाई कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३४:
१९८३ साली सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यावर शांताबाई कांबळे यांनी लिहिलेले 'माज्या जल्माची चित्तरकथा' हे आत्मवृत्त प्रसिद्ध झाले. दलित महिला लेखिकेने लिहिलेले हे भारतातील पहिले आत्मकथन आहे.
दिनकर साक्रीकरांच्या प्रयत्नांतून हे आत्मवृत्त १९८२ साली ‘पूर्वा’ मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाले.
जन्माने महार. पुढे ५७ साली डॉ. बाबासाहेबांच्या प्रेरणेने धर्मांतर केले. महारकीची कामे करीत, सुगीच्या वेळी शेतावरच्या बैलांनी खाल्लेली आणि शेणातून पडलेली ज्वारी धुवूनधुऊन स्वच्छ करून खात, सातवीपर्यंतचे शिक्षण खेड्याहूनही खेडे असलेल्या गावात शांताबाईंने आवडीने व जिद्दीने केले. नंतरही गावातून अन्न गोळा करत घरी आणण्याची पाळी आली, तर तेही केले. लग्न झाल्यावर नवऱ्याने दुसरी बायको करून आणली म्हणून स्वतःचे व्यक्तिमत्त्व शोधायला घराबाहेर पडलेली ही दलित ‘नोरा’ मास्तरकी करीत शिक्षणक्षेत्रात शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झाली. 'माज्या जल्माची चित्तरकथा' या पुस्तकावर आधारित नाजुका या नावाने एक दूरचित्रवाणी मालिका होती.
शांताबाई कांबळे यांचा अनेक पुरस्काराने सन्मान झाला आहे, त्यांत दलितमित्र हा एक सन्मान आहे.