"रिचर्ड निक्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ६:
आपल्या पहिल्या अध्यक्षीय राजवटीत निक्सनाने [[व्हियेतनाम युद्ध|व्हियेतनाम युद्धास]] वाढणारा वाढता देशांतर्गत विरोध लक्षात घेऊन [[व्हियेतनाम|व्हियेतनामातून]] अमेरिकन सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला, इ.स. १९७२ साली [[चीनचे जनता-प्रजासत्ताक|चीनच्या जनता-प्रजासत्ताकास]] अधिकॄत भेट देऊन अमेरिका-चीन राजनैतिक संबंध पुन्हा स्थापण्यात पुढाकार घेतला, तसेच त्याच वर्षी [[सोव्हिएत संघ|सोव्हिएत संघाशी]] क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्रांवर मर्यादा घालून घेण्याचा तह केला. [[चंद्र|चंद्रावर]] मानव पाठवण्याच्या अमेरिकी प्रयत्नांना [[अपोलो ११]]च्या रूपाने निक्सन प्रशासनाच्या कार्यकाळातच यश लाभले; तरीही एकंदरीत दॄष्टिकोनातून पाहता निक्सन प्रशासनाने समानव अंतराळ मोहिमा सीमित करण्याचेच धोरण अनुसरले. इ.स. १९७२ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत निक्सन मोठ्या मताधिक्याने अध्यक्षपदाच्या दुसऱ्या मुदतीसाठी निवडून आला.
 
दुसऱ्या मुदतीत मात्र निक्सन प्रशासनास अडचणींना सामोरे जावे लागले : [[योम किप्पुर युद्ध|योम किप्पुर युद्धात]] [[इस्रायल|इस्राएलास]] अमेरिकेने पाठिंबा दिल्यामुळे अरब राष्ट्रांनी अमेरिकेशी तेलव्यापार बंद केला. याच सुमारास वॉशिंग्टन डी.सी.तील अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयात झालेल्या घुसखोरीतूनु उद्भवलेले प्रकरण मोठ्या थरापर्यंत वाढून [[वॉटरगेट प्रकरण]] उघडकीस आले. निक्सन प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न करूनही प्रकरण हाताबाहेर गेले व त्यामुळे निक्सन प्रशासनाने राजकीय आधार मोठ्या प्रमाणात गमावला. [[महाभियोग]] चालवला जाऊन अध्यक्षपदावरून हकालपट्टी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे १८ एप्रिल, इ.स. १९७४ रोजी निक्सनाने अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अध्यपदावर आलेल्या [[जेराल्ड फोर्ड]] याने मात्र निक्सनास उद्देशून वादग्रस्त ठरलेला माफीनामा जाहीर केला. निवॄत्तीनंतर निक्सनाने आपल्या राजकीय अनुभवांवरून पुस्तके लिहिली व परदेश दौरे केले. त्यामुळे आधीची डागाळलेली प्रतिमा धुवूनधुऊन "अनुभवी, ज्येष्ठ मुत्सद्दी" म्हणून प्रतिमा सुधारण्यात त्याला यश आले. १८ एप्रिल, इ.स. १९९४ रोजी [[पक्षाघात|पक्षाघाताचा]] घटका येऊन त्याचा मॄत्यू झाला.
 
== बाह्य दुवे ==