"हेमंत कुमार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३३:
हेमंतदांचा जन्म १६ जून १९२० ह्या दिवशी [[वाराणसी]] येथे झाला. त्यांचे बालपण बंगालमधील एका खेड्यात गेले. त्याकाळी खेड्यात होत असलेली नाटके पहात आणि लोकसंगीत ऐकत हेमंतदा मोठे झाले, पण संगीताचे औपचारिक शिक्षण हेमंतदांना मिळाले नाही. त्यांचा कुटुंबीयांचा संगीतक्षेत्राशी काहीही संबंध नव्हता. [[कोलकाता]] येथील महाविद्यालयात शिकताना १९३५ साली त्यांनी आकाशवाणीवर गाण्याची चाचणी परिक्षा दिली आणि गायक म्हणून ते आकाशवाणीवर गायला पात्र झाले.
 
गायनात गती असणाऱ्या हेमंतदांना साहित्यक्षेत्रातदेखिल रस होता. १९३७ साली त्यांनी लिहिलेली एक लघुकथा आणि गायलेले एक गाणे ह्या दोन्ही गोष्टी प्रसिद्ध झाल्या आणि हेमंतदांमधील कलाकार जन्मास आला. वर्षभर विद्युत अभियांत्रिकी शिकल्यावर त्यांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ संगीतकार म्हणून काम करण्यास सुरूवातसुरुवात केली.
 
==गायक आणि संगीतकार==
१९४० साली 'निमोई संन्यासी' ह्या बंगाली चित्रपटासाठी तर १९४४ साठी 'ईरादा' ह्या हिंदी चित्रपटांसाठी गाणी गाऊन हेमंतदांचा चित्रपटातील पार्श्वगायकाच्या कारकीर्दीस सुरूवातसुरुवात केली. पैकी बंगाली चित्रपटासाठी संगीतकार हरि प्रसन्नो दास ह्यांच्या हाताखाली सहाय्यक संगीत दिग्दर्शक म्हणूनही हेमंतदांनी काम केले. स्वतंत्र संगीतकार म्हणून त्यांनी १९४५ सालच्या पूर्बोरंग ह्या बंगाली तर १९५२ सालच्या आनंदमठ ह्या हिंदी चित्रपटाला संगीत दिले.
 
१९५४ सालच्या नागिन चित्रपटासाठी संगीतदिग्दर्शित केलेले त्यांची गाणी खूप गाजली. ह्याच चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून पुरस्कारदेखिल मिळाला. गायक म्हणून हेमंतदांनी हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रातील जवळपास सर्व आघाडीच्या संगीतकारांकडे गाणी गाईली.