"सौदागर नागनाथ गोरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४७:
कोरेगावमध्ये मराठी तिसरीपर्यंतच सौदागरांचे शिक्षण झाले. शाळेत कॊणी पाहुणा येणार असेल तर ईशस्तवन व स्वागतपद्य म्हणण्यासाठी सौदागरांना सांगितले जाई. शाळेला भेट देणाऱ्या दामूअण्णा जोशी यांनी या रत्नास अचूक हेरले आणि सौदागरांचे वडील नागनाथ गोरे यांच्याकडे या मुलाची मागणी केली. सौदागर आणि धाकटा भाऊ पितांबर यांना घेऊन दामूअण्णा पुण्याला आले. आणि सौदागरांचे संगीत शिक्षण सुरू झाले. त्यांना नाट्यगीते शिकवण्यासाठी बळवंत गोवित्रीकर यांना बोलावण्यात आले. दत्तूबुवा बागलकोटकर यांनी त्यांना शास्त्रीय संगीताचे धडे दिले. यानंतर नरहरबुवा पाटणकर, गणेशबुवा पाध्ये यांनीही सौदागरांना गायनाचे शिक्षण दिले. टप्पा आणि ठुमरीचेही शिक्षण दिले.
 
[[प्र.के. अत्रे]] यांच्या साष्टांग नमस्कार या नाटकात सौदागरामची स्त्री-भूमिका होती. त्यानंतर घराबाहेर या नाटकात सुरूवातीलासुरुवातीला स्त्रीभूमिका आणि मग पुरुष भूमिका होती. उण्यापुऱ्या १० वर्षे वयाच्या सौदागराने ’'प्राणप्रतिष्ठा’' ह्या नाटकाद्वारे मराठी नाट्यसंगीत क्षेत्रात प्रवेश केला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.rediff.com/news/1998/jan/02gandh.htm | title = ''छोटा गंधर्व डेड'' (''छोटा गंधर्व वारले'') : छोटा गंधर्व ह्यांच्या निधनाचे वृत्त | प्रकाशक = रेडिफ.कॉम | दिनांक = २ जानेवारी, इ.स. १९९८ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. [[अनंत हरी गद्रे]] ह्या समाजसुधारकाने मधुर गळ्याच्या सौदागरला 'छोटा गंधर्व' हा किताब बहाल केला<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://www.mumbaimirror.com/printarticle.aspx?page=comments&action=translate&sectid=135&contentid=20090605200906050209319779e238541&subsite= | title = ''राग मफिन'': छोटा गंधर्व ह्यांच्यावरील लेख|विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/PEqZ |विदा दिनांक=२५ ऑगस्ट २०१४ | प्रकाशक = मुंबईमिरर.कॉम | दिनांक = ५ जून, इ.स. २००९ | अ‍ॅक्सेसदिनांक = ११ जुलै, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते. देवमाणूस या नाटकातील पदांच्या चाली छोटा गंधर्व यांच्या होत्या.
 
छोट्या गंधर्वांना १९५० साली अभिजात संगीत नाटकांमधून कृष्णाची भूमिका करण्याची संधी मिळाली. या भूमिकेने इतिहास घडविला. त्यानंतर मानापमानमधे धैर्यधर या पहिल्या अंकातील शूर वीर आणि नंतरचा प्रेमात पडलेला धैर्यधर या भूमिका छोटा गंधर्व इतक्या सुंदर करायचे की प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घ्यायचेच बाकी ठेवले होते.