"श्रीनिवास खळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३४:
 
==संगीतकार==
बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर खळेअण्णा मुंबईत आले. पण त्यांना काम मिळेना. ह्या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची मोलाची मदत झाली त्याच्यामुळे राहण्या-खाण्याची सोय झाली. इथेच त्यांची ओळख के. दत्ता (दत्ता कोरगावकर) ह्या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकरसाहेबांचे साहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरूवातसुरुवात केली. ह्याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या, मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळेसाहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले. त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आले होते. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काही तरी दुसराच नोकरीधंदा शोधावा अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते. पण अशा वेळी त्यांच्या पत्नीने त्यांना धीर दिला आणि ह्या प्रसंगातून त्यांना सुखरूप बाहेर काढले. बऱ्याच हालअपेष्टांनंतर [[इ.स. १९५२]] साली त्यांची ‘गोरी गोरी पान’ आणि ‘एका तळ्यात होती बदके पिले सुरेख’ दोन गाणी असलेली पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. आशा भोसले यांची तिच्यातील ही गीते तेव्हा खूप लोकप्रिय झाली आणि त्याबरोबर श्रीनिवास खळे हे नावदेखील. ह्या दोन्ही रचना [[ग. दि. माडगूळकर]] ह्यांच्या होत्या. मुळात ह्या रचना लक्ष्मीपूजन ह्या चित्रपटासाठी होत्या. पण ऐन वेळी हा चित्रपट मूळ निर्मात्याऐवजी दुसऱ्याच एका निर्मात्याने बनवून त्यात संगीतकार म्हणून खळ्यांना घेतलेच नाही. पण खळ्यांनी लावलेल्या ह्या गीतांच्या चाली गदिमांना इतक्या आवडल्या होत्या की त्यांनी त्यांची एचएमव्हीकडून एक वेगळी तबकडी बनवून घेतली. ह्या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी दिली आणि मग खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावले. ह्या गाण्यांसंबंधीची खरी हकीकत खुद्द खळेसाहेबांच्या शब्दांत वाचा.
 
१ मे [[इ.स. १९६०]] हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस. ह्यासाठी खास राजा बढेंनी दोन महाराष्ट्रगीते लिहिली. त्यापैकी एक म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत. हे गीत शाहीर साबळे ह्यांनी गायले आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधली आहे. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. ही पावती जितकी राजा बढे ह्यांच्या काव्याला व शाहिरांच्या गायनाला आहे तितकीच ती खळेसाहेबांच्या संगीतालादेखील आहे. दुसरे महाराष्ट्र गीत म्हणजे महाराष्ट्र जय, महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महान, हे गीतसुद्धा खूपच गाजले.