"शोले (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४०:
== कथानक ==
{{गौप्यस्फोट इशारा}}
चित्रपटाच्या सुरूवातीलासुरुवातीला एक पोलीस अधिकारी ठाकुर बलदेवसिंगाने बोलावल्यामुळे त्यांना भेटायला येतात. भेटीमध्ये ठाकुर पोलीस अधिकाऱ्याला आपला बेत सांगतो. काही वर्षांपूर्वी पोलीससेवेत असताना त्याने जय आणि वीरू नावाच्या दोन भुरट्या चोरांना पकडलेले असते. त्यांना तुरुंगात नेताना वाटेत पोलिसांवर डाकूंचा हल्ला होतो. जय व वीरू पोलिसांच्या बाजूने लढण्यासाठी आपले पाश सोडवण्याची विनंती करतात. ठाकुर आपल्या जोखमीवर दोघांना मोकळे करतो. जय, वीरू व ठाकुर असे तिघे मिळून डाकूंचा हल्ला परतवून लावतात. परंतु या चकमकीत ठाकुर घायाळ होतो. खरे तर, जय व वीरूंसाठी पळून जाण्यासाठी ही चांगली वेळ असते. परंतु ठाकुराला हॉस्पिटलात पोचवायचे की नाही यासाठी जय नाणेफेक करतो. नाणेफेकीचा निर्णय होकारात्मक ठरतो. त्याप्रमाणे ते दोघे ठाकुराला हॉस्पिटलात पोचवतात व त्याचा जीव वाचवतात. ठाकुराला ही गोष्ट आठवते. जय आणि वीरू हे दोघे गब्बरसिंग नावाच्या अतिशय क्रूर डाकूविरुद्ध झुंजण्यास लायक आहेत असे ठाकुराला वाटत राहते. म्हणून, या दोघांना हुडकून देण्याची विनंती ठाकुर भेटीला आलेल्या पोलिस अधिकाऱ्याला करतो.
 
इकडे जय व वीरू अजूनही भुरट्या चोऱ्या करून आपले जीवन व्यतीत करत असतात. दरम्यान त्यांची मैत्री अजूनच गाढ होते. पोलिस अधिकाऱ्यांना हे दोघेजण एका तुरुंगात आढळतात. त्यांची ज्या दिवशी सुटका होते त्या दिवशी पोलीस त्यांची गाठ ठाकुराशी घालून देतात. ठाकुर आपला इरादा त्यांना सांगतो व गब्बरसिंगाला पकडून दिल्यास त्यांच्यातर्फे २० हजारांचे व सरकारचे ५० हजार रुपयांच्या इनामाचे आमिष त्यांना दाखवतो. या आमिषापोटी जय व वीरू गब्बरसिंगाला जिवंत पकडून देण्याचे आव्हान स्वीकारतात.