"रामदास स्वामींनी रचलेल्या आरत्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४५:
'''नवरसांचे दर्शन:'''
 
त्यांच्या आरत्यात भक्तिरस तर परिपूर्ण आहेच. पण शांतरस, वीररस, करुणरस, हास्यरस ही आहे. दत्ताच्या आरतीत ब्रह्मा, विष्णू, महेश अनसूयेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यास आले तेव्हा तिच्या पातिव्रत्याच्या तेजाने तिन्ही देव बालके झाली. पतीचे बालरूप पहाण्यास अनसूयेने देवांच्या पत्नींना हाका मारल्या आणि आपला पती ओळखा बघू म्हणून सांगितले, अशी गंमत त्यांनी आरतीत वर्णिली आहे. देवीच्या आरतीत "आदिमाया, जगत्‌जननी, मायभवानी" अशी विशेषणे वापरून, जगदंबेचे माहात्म्य अती ओजसपणे, भक्तिरसाने परिपूर्ण, नतमस्तक होऊन, आणि मी तुझा पुत्र आहे हा भाव अंतरी ठेऊनठेवून वर्णिले आहे.
 
समर्थांची भाषाशैलीत त्यांच्या ठायीचा आत्मविश्वास दिसतो. सगुण रूपाचे वर्णन करताना ते प्रत्यक्ष रामदर्शनात रंगून जातात. ‘मी दास’ हा भाव प्रकट करतात. रामी रामदासी अशी त्याची समाधी लागलेली असे. आरतीत त्यांनी अनेक वाद्यांचे गजर केले आहेत. अनेक फुलांचा, दागिन्यांचा उल्लेख आहे. तू राक्षसांचा संहार कर्ता, भूतबाधा नाश करणारा, भक्त तारणारा, पतितपावन, संकटमोचन असे परिणामकारक, अर्थपूर्ण वर्णन आहे. प्रचिती देणारी रसपूर्ण अशी त्यांच्या आरत्यांची रचना आहे. त्यांच्या भाषेत कुठे कुठे टप्पे घेणाऱ्या चेंडूप्रमाणे तर कुठे सोंडेत साखळदंड धरून आवाज करणाऱ्या हत्तीप्रमाणे तर कधी धनुष्याच्या टणत्काराप्रमाणे तर कुठे सरस्वतीच्या वीणेच्या झंकाराप्रमाणे, कुठे रसपूर्ण चवदार फळांप्रमाणे तर कुठे मधाचे बोट चाटावे तसे अतिशय गोड असे वैचित्र्य आहे. त्यांच्या आरत्यांत औदार्य आहेच, पण जीवीचे आर्तही आहे. रामाला वर देण्याची ताकद दाखवून देवीचे माहात्म्य किती श्रेष्ठतम वर्णिले आहे. देवांच्या, देवीच्या, गुरूंच्या आणि जे आपणास आदरणीय आहेत, त्यांच्या आरत्या गायल्या जातात. कवीसमोर, सर्वशक्तिमान, सर्वसाक्षी, सद्‌गुणसंपन्न दैवत असते. त्याला अनन्यभावाने शरण जाणे आणि आपला उद्धार करण्याची याचना करणे, मी लीन, अज्ञानी, मूढ, अविवेकी असा हीन भाव स्वीकारणे हा भाव असतो. ह्या भवसागरातून सोडव हेच मागणे आरत्यांत असते. आरती वाङ्‌मयातून भारतीय संस्कृतीचे प्रतिबिंब दिसते. मंदिर असो, घर असो, सार्वजनिक स्थळ असो, जेथे भगवंताची मूर्ती तेथे आरतीचे सूर गुंजत असतात. समर्थ रामदासांच्याकडे केवळ भावभक्तीच नव्हती तर, तिच्या जोडीला कलाविलास होता. कवित्व करणारा मति-प्रकाश होता. ज्यायोगे "‘श्रवण रस तुंबळे' असा वाग्विलास त्यांना साध्य झाला" अशा शब्दात कवी यशवंतांनी समर्थांच्या आरत्यांची महती सांगितली आहे.