"मुळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १५:
* मूळव्याध असणाऱ्या रुग्णांना मुळ्याची पाने अथवा त्यांचा रस दिल्याने फायदा होतो. मुळ्याच्या कंदांपेक्षा त्याच्या पानाच्या रसात अधिक गुणधर्म आढळतात. मुळ्याची पाने पचण्यास हलकी, रुची निर्माण करणारी आणि गरम आहेत. ती कच्ची खाल्ल्यास पित्त वाढते, मात्र तीच भाजी तुपात घोळवल्यास भाजीतल्या पौष्टिक गुणधर्मात वाढ होते.
* भाजी, कोशिंबीर आणि थालिपिठे-कोशिंबिरीसाठी पांढरा मुळा स्वच्छ धुवून, किसून घ्यावा. त्या किसलेल्या मुळ्यात खवलेले ओले खोबरे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करावी. चवीनुसार मिश्रणात मीठ आणि साखर घालावी. कमी तेलावर जिरे, हिंग, मोहरी आणि कढीलिंबाची फोडणी करून, ती किसलेल्या मुळ्यावर ओतावी. कोशिंबिरीत हळद घालू नये. अशा प्रकारे लाल मुळ्याचीही कोशिंबीर करता येते. या कोशिंबिरीत गोडे दही घातल्याने स्वादात अधिक भर पडते.
* मुळ्याची भाजी करताना मुळा पाल्यासकट धुवून, बारीक चिरून घ्यावा. कांदा बारीक चिरून घ्यावा. दोन चमचे तुरीची डाळ गरम पाण्यात भिजत ठेवावी. तेलाच्या फोडणीत लसणीच्या पाकळ्या ठेचून घालाव्यात. त्या फोडणीवर हिरवी मिरची, हळद, तूर डाळ आणि बारीक चिरलेला कांदा घालून फोडणी चांगली परतून घ्यावी. चांगल्या परतलेल्या फोडणीत मुळ्याची चिरलेली भाजी घालावी. पाण्याचा हबका मारून पातेल्यावर झाकण ठेवावे. झाकणावर पाणी ठेऊनठेवून वाफेवर भाजी शिजवावी. भाजी शिजल्यावर त्यात साखर आणि मीठ घालावे. वाफेवर भाजी पूर्ण शिजली की त्यात ओले खोबरे घालावे. गोड्या डाळीबरोबर ही भाजी चविष्ट लागते.
* बारीक चिरलेल्या मुळ्याच्या पाल्यात मीठ घालून पाला चांगला मळावा. मळल्यावर मुळ्यालापाणी सुटते. तो पाला पिळून पाणी वेगळं काढावे.त्याच पाण्यात भाजी शिजवावी. बाहेरचे पाणी घालून भाजी शिजवल्याने भाजीची चव बिघडते. या पाण्यातभाजी शिजवताना मीठ कमीच घालावे. ही भाजी पूर्ण शिजल्यावर त्यात वरून खोबरेल तेल घालावे.
* मुळ्याचे थालिपीठही रुचकर लागते. दोन मध्यम आकाराचे मुळे किसून घ्यावेत. किसल्यावर त्यांचा रस पिळून घ्यावा. कीस पिळल्यावर त्यातील उग्रपणा कमी होतो. किसात एक बारीक चिरलेला कांदा, एक वाटी तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बेसन, अर्धा चमचे धणे-जिरे पावडर, पाव चमचा हळद, अर्धा चमचा साखर, ओल्या खोबरयाचे पातळ तुकडे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ असे सगळे साहित्य एकत्र करून घालावे. गरजेपुरते पाणी टाकून मिश्रण मळून घ्यावे. प्लास्टिकच्या कागदावर किंवा केळीच्या पानांवर तेलाचा हात लावून मळलेल्या पिठाची थालिपिठे थापावी. तव्यावर तेल गरम करून ती मंद आचेवर भाजावी. दही किंवा लोण्यासोबत पानात वाढावीत..
"https://mr.wikipedia.org/wiki/मुळा" पासून हुडकले