"मासा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ८:
डासांच्या अळ्या नष्ट करून हिवतापाचे (मलेरियाचे) निर्मूलन करण्याच्या कामी गॅम्‍ब्‍यूझसारख्या (गप्पी) माशांचा फार उपयोग होतो. काही मासे नारूसारख्या रोगाचा प्रतिबंध करण्यास उपयोगी पडतात. काही मासे प्रायोगिक प्राणी म्हणून तर काही पाण्यातील प्रदूषण शोधून काढण्यास उपयुक्त ठरतात.
 
ज्या माशांच्या जातीचे सहज प्रजनन होऊ शकते व जे आकारमानाने लहान पण रंगदार व दिसण्यात आकर्षक असतात असे गोड्या पाण्यातील मासे काचेच्या जलजीवपात्रात ठेऊनठेवून घराची शोभा वाढविणे व मनोरंजन करणे हाही जगातील लक्षावधी लोकांचा व्यवसाय आहे. एकट्या उत्तर अमेरिकेत या व्यवसायात अंदाजे पन्नास लक्ष लोक गुंतलेले असावेत. चीन, जपान व इतर दक्षिण आशियातील राष्ट्रांतही हा एक आवडीचा छंद मानला जातो.मुंबईत अनेक लोकांच्या घरी माशांची जलजीवपात्रे आढळतात. मुंबईतील तारापोरवाला जलजीवालय प्रसिद्ध आहे.[⟶ जलजीवालय].
 
पाण्यात गळ टाकून मासे पकडणे हाही प्रकार जगात सर्वत्र आढळतो. या प्रकाराने काही गोरगरीब चरितार्थासाठी मासे पकडतात, तर काही छंद म्हणून हौसेने मासेमारी करतात. या कामासाठी लागणारी उपकरणे अत्यंत साधी व गरिबांच्या आवाक्यात असलेली असू शकतात, तर काही किंमती असतात. किंमती उपकरणे तयार करण्याचे कारखाने बऱ्याच विकसित देशांत आहेत. हा छंद असलेले, निरनिराळ्या सामाजिक वा आर्थिक स्तरांतले लाखो लोक जगात आहेत. काही मासे शिकारी मासे म्हणून प्रसिद्ध आहेत. ते सहजगत्या गळास लागत नाहीत. काही वेळा बंदुकीने त्यांची शिकार केली जाते.[⟶ मत्स्यपारध].
ओळ ३४:
कार्पस्-मासे हा भारतातील शेती-संवर्धनाचा मुख्‍य आधार आहे व तीन प्रकारचे भारतीय कार्प (कटला, रोहू, मृगळ) तसेच तीन प्रकारचे परदेशी मासे चंदेरी, गवती आणि सामान्य असे मिळून देशातील मत्स्यशेती उत्पादनाचा ८५% पेक्षा ही अधिक वाटा उचलतात.
 
पावसात खाडीकिनाऱ्यावर शिंगाली माशांसारखे दिसणारे, मात्र त्यापेक्षा आकारने लहान असणारे तीन काटय़ांचे म्हणजेच चिवनी मासा म्हणतात. हा मासा तेलकट असल्यामुळे तो हातात धरताच सटकतो. त्याचा काटा टोचल्यास इजा होते. खाडीकिनारी हे मासे अंडी घालतात.पावसाळ्याच्या सुरूवातीलासुरुवातीला हजारोंच्या संख्येने हे मासे किनाऱ्यावर येतात. यांनाच '''शिंगळा''' शिंगटे किंवा शिंगाडा म्हणतात.
 
माशांच्या प्रकारांमधील [[पापलेट]], [[रावस]], [[सुरमई]], [[बांगडा]], सौंदाळे, [[हलवा (मासे)|हलवा]], घोळ इ. मोठे आणि कमी काटे असलेले मासे. छोटय़ा आणि काटेरी माशांमध्ये करली, भिंगी, पाला (हे तिन्ही मोठे, पण भरपूर काटे असलेले मासे आहेत) तर मांदेली, मोदकं, [[बोंबील]], कांटा, तारली, मुडदुसे, टोकेरी सुळे, बोयटं, पेडवे, निवटे (निवटी), शिंगाडा इत्यादी अनेक प्रकारचे मासे खाल्ले जातात. मोरी / मुशी (शार्कची जात) या माशाला काटे नसून केवळ मध्यभागी मणका असतो, हा पथ्याचा मासा म्हणून बिनधोकपणे खाल्ला जातो.
"https://mr.wikipedia.org/wiki/मासा" पासून हुडकले