"मांजरा नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Karnataka topo deu.png|thumb|right|250px|वरच्या बाजूस मांजरा नदीचे खोरे दर्शवणारा [[दख्खन|दख्खनेचा]] नकाशा (जर्मन मजकूर)]]
'''मांजरा''' ही [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक]] व [[तेलंगणा]] या तीन राज्यांतून वाहणारी एक [[नदी]] आहे. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. ही नदी महाराष्ट्र राज्यातील [[बीड]] जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. [[गोदावरी नदी]]ची ती एक प्रमुख उपनदी आहे. सुमारे ७२५ किमी. लांबीची ही नदी, सुरूवातीलासुरुवातीला पूर्ववाहिनी असून [[बीड]]-[[उस्मानाबाद]] तसेच [[बीड]]-[[लातूर]] या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे.
 
मांजरा नदीवर बीड जिल्ह्यातील केज येथील धनेगाव येथे मांजरा धरण (धनेगाव)आहे.कासारखेडजवळ ही नदी [[लातूर]] जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्याच्या मध्यभागातून वाहताना आग्नेयेस जाऊन [[निलंगा]] गावाजवळ कर्नाटक राज्यात व पुढे बिदरच्या पूर्वेस [[तेलंगणा]] राज्यात प्रवेश करते. आंध्र प्रदेशातील संगरेड्डीपेटजवळ मांजरा नदी एकदम वळण घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते. [[निझामाबाद]] जिल्ह्यात या नदीवर धरण बांधण्यात आले आहे. धरणाच्या तलावाला [[निझामसागर]] तलाव म्हणतात. पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्ह्यातील शेळगावपासून ईशान्येस, राज्याच्या सरहद्दीवरून वाहत जाते व याच जिल्ह्यातील कुंडलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस उजवीकडे मिळते. तेरणा, कारंजा, तावरजा,लेंडी व मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.तसेच केज,चौसाळा,लिंबा,डिघोळ देशमुख,घरणी व रेणा या छोट्या नद्याही मांजरा नदीच्या उपनद्या आहेत. या नदीस तेरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस, तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते, लेंडी व [[मन्याड नदी|मन्याड]] या नद्या नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवर या नदीला डावीकडून मिळतात.