"पीटर द ग्रेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
सांगकाम्या (चर्चा | योगदान) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो शुद्धलेखन (अधिक माहिती) |
||
ओळ ५:
थोर राष्ट्रपुरूष पीटर वयाच्या १० व्या वर्षीच रशियाचा त्सार झाला. पण रशियाच्या राजावर तत्कालीन सरदार-उमरावांचा मोठा प्रभाव असल्याने राजा असूनही राष्ट्रापेक्षा स्वतःकडे आणि सरदार-उमरावांकडेच जास्त लक्ष असल्याने रशिया त्याकाळी असंस्कृत, गावंढळ, मागसलेला मानला जाई. पुढील दहा वर्षांच्या काळात त्सार पीटरने सर्व सत्ता आपल्या हातात एकवटली.
रशियाला सामर्थ्य मिळवून देण्यासाठी स्वतःचे नौदल असावे असे पीटरला वाटू लागले. त्यासाठी त्याने वर्षभरातच युद्धनौका तयार करून तुर्की लोकांच्या अधिपत्याखाली असलेल्या '''अझोव्ह''' या बंदरावर हल्ला केला. पण त्यात यश आले नाही. या अपयशाने न खचता पीटरने आपल्या मर्जीतल्या काही मंडळींना [[युरोप|युरोपमधील]] विविध ठिकाणी आवश्यक असलेल्या ज्ञानर्जनासाठी पाठवून दिले. या विशेष दलात स्वतः त्सार पीटरही नाव आणि वेष बदलून राहिला. तो स्वतः [[नेदरलँड्स]] देशातील विविध अभियंते आणि तज्ज्ञ मंडळींना भेटला, त्यातील काहींना त्याने मोठ्या रकमेच्या मोबदल्यात रशियात काम करण्यासाठी पाठवून दिले. पीटर परदेशात असतांनाच रशियातील त्याच्या अंगरक्षकांच्या एका गटाने देशात बंड केल्याचे त्याच्या कानावर आल्याने पीटर आपला दौरा सोडून तातडीने स्वदेशी परतला. त्याने ते बंड मोडून काढले, अनेकांना कठोर शिक्षा दिल्या आणि कित्येकांना मृत्युदंडाची शिक्षाही त्याने दिली. एक राजा म्हणून या परिस्थितीचा फायदा उचलत पीटरने लोकांवर दहशत पसरवत रशियाला आधुनिकतेकडे नेण्यास
पीटरने आपल्या देशाचा सर्वांगाने विकास व्हावा म्हणून वस्तु निर्मितीसाठी कारखाने काढले, शेतीच्या पद्धतीत सुधारणा केली, दळणवळणासाठी नवे कालवे खोदले, लोकांना कामाची सवय लावली, शेतीसह सर्व उद्योगातून कर गोळा केला. जमा झालेला सर्व पैसा पुन्हा जनकल्याणासाठीच वापरला. विविध मार्गांनी रशियाची प्रगती सुरू झाली. पण त्यासाठी पीटरला अत्यंत कठोर वागावे लागले. त्याने जनतेला अमानुष वागणूक दिली. सगळ्यांच्या फायद्यासाठी काहींना तोटा सहन करावा लागला.
त्सार पीटर सुदृढ बांध्याचा, जवळजवळ ७ फुट उंचीचा, बलवान होता. तो सतत कोणत्यातरी उद्योगात व्यस्त राहत असे. राजनीती, न्याय, उद्योगधंदे अशा अनेक क्षेत्रात तो जातीने लक्ष घालीत असे. कित्येकदा पीटर २-३ दिवस सतत कामे करीत राही, झोपायला सुद्धा त्याला वेळ मिळत नसे. यातच पीटरने [[सेंट पीटर्सबर्ग]] शहर वसविण्यास
[[स्वीडन|स्वीडनने]] साम्राज्यवादाचा पुरस्कार केला व रशियाची अमाप भूमी व साधनसंपत्ती त्यांना खूणवत होती. पीटरने रशियावरील आलेले स्वीडनचे संकट मोठ्या धैयाने परतवून लावले. इ.स. १७०० ते १७२१ असे २१ वर्षे रशियाचे स्वीडनशी युद्ध सुरू राहिले. १७२१ साली स्वीडनने तह करून [[बाल्टिक समुद्र|बाल्टिक समुद्राच्या]] फार मोठ्या प्रदेशावर रशियाचे वर्चस्व मान्य केले. रशिया सामर्थ्यवान राष्ट्र बनत चालले होते.
|