"दत्तो वामन पोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३७:
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या बौद्धिक मार्गदर्शनात त्यांनी भाग घेतला होता. मराठी शुद्धलेखन महामंडळाचेही काही वर्षे ते अध्यक्ष होते. तमाशा सुधारणा समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे. त्यांचा इतिहासाचा अभ्यास फार मोठा होता. प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांवर त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही बरेच स्फुट लेखन केले आहे.
 
इ.स. १९६२ साली जे शुद्धलेखनाचे नियम मराठी महामंडळाने मान्य केले, त्याखाली दत्तो वामन पोतदारांनी सुचवलेली एक टीप होती. ‘हे नियम असले तरी जुन्या नियमांप्रमाणे केलेले लेखन अशुद्ध आणि त्याज्य मानू नये.’ सुरूवातीलासुरुवातीला काही वर्षे नियमांच्या यादीखालची ही टीप छापली जात असे.. मात्र पुढे संबंधितांनी ती सोईस्करपणे वगळली..
 
त्यांना महाराष्ट्राचा साहित्यिक भीष्म म्हणतात. या कार्यासाठी त्यांनी आजीवन अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.