"झुल्फिकार अली भुट्टो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४:
 
== बालपण व शिक्षण ==
झुल्फिकार अली भुट्टो हे पाकिस्तानातील [[सिंध]] प्रांतातील श्रीमंत जमीनदार घराण्यातून होते. त्यांचा आयुष्याचा सुरूवातीचासुरुवातीचा काळ भारतातच गेला. भुट्टोंचे वडील तत्कालीन [[जुनागड संस्थान|जुनागड संस्थानाचे]] दिवाण होते. फाळणीनंतर त्यांनी पाकिस्तानाशी संधान साधले. तसे सल्ले त्यांनी नवाबाला ही दिले. याची कुणकुण लागल्यावर भारताने पोलिस कारवाईचा ताकीद दिली. जुनागडाचा नवाब पाकिस्तानात पळून गेला. पण याचा विपरीत परिणाम झुल्फिकार अली भुट्टोंच्या भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठीच्या अर्जावर झाला. त्यांची भारतीय बनण्याची तीव्र इच्छा होती. पुढे १९५७ मध्ये पाकिस्तानी सरकारात मंत्री पद मिळाल्यावर त्यांनी भारताच्या सर्वोच्य न्यायालयात असणारा आपला नागरीकत्वाचा अर्ज मागे घेतला. फाळणीपुर्वीचे त्यांचे शिक्षण भारतात मुंबई येथे झाले. फाळणीनंतर ते १९४७ साली उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले. पुढे १९५० साली ते लंडनला कायद्याच्या अभ्यासासाठी गेले. तेथुन ते पुन्हा भारतात परतले. पण त्यांचे वडिल त्यापूर्वीच पाकिस्तान गेले होते. भारताचे नागरिकत्व ही मिळ्णे धुसर होते. अशात ते पाकिस्तानात वडिलांकडे गेले. तेथे त्यांनी घराण्याच्या व्यवसायात लक्ष घातले. तसेच सिंध विद्दयापिठात नोकरी पत्करली.
 
== राजकारण ==
ओळ १३:
 
=== अखेरचा काळ ===
पुढे इस्लामी कट्टरपंथी आणि महत्त्वाकांक्षी लष्करशाहीच्या कचाट्यात ते सापडले. [[शरिया]] लागू करण्यासाठी त्यांच्यावर राजकीय दडपण वाढू लागले. त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे सतत आरोप होऊ लागले. स्वतःचे पद भक्कम ठेवण्यासाठी त्यांची वृत्ती काहीशी हुकुमशहा पद्धतीची झाली. त्यांनी लष्कर व पोलिसदलांशिवाय पंतप्रधानांच्या आधिपत्याखालील स्वतंत्र सशस्त्र दल निर्माण केले. विरोधी पक्षांनी त्यांच्या विरोधात एकत्र येत व्यापक आंदोलन पुकारले. त्यातच इ.स. १९७७ सालातल्या निवडणुकींत घोटाळ्याचे आरोप झाले. सुरूवातीससुरुवातीस या आरोपांचा ठामपणे नकार देणाऱ्या भुट्टोंनी अचानक काही प्रमाणात गैरप्रकार झाल्याची कबुली दिली. याचे निमित्त करून जनरल [[झिया उल हक]] यांनी लष्करी उठाव केला. भुट्टोंना अटक करण्यात आली. पुढे त्यांच्यावर खुनाचे आरोप ठेऊनठेवून खटले चालवण्यात आले. त्यांच्यासह आणखी ४ सहकाऱ्यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. ही शिक्षा कमी करावी किंवा अमलात न यावी यासाठी मोठा आंतरराष्ट्रीय दबाव आला. तरीही झिया उल हकांनी इ.स. १९७९ साली झुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर चढवले.
 
== संदर्भ ==