"जॉनी लिव्हर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती); शुद्धलेखन — विसर्ग (अधिक माहिती)
ओळ ४०:
असे सारे ठीक सुरू असताना वडिलांचे दारूचे व्यसन वाढले व जॉनीच्या नशिबाचे चक्र फिरले. त्यांचे कुटुंब किंग्ज सर्कलच्या झोपडपट्टीत राहायला आले. जॉनी वडाळ्याच्या आंध्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमधे तेलुगू माध्यमाच्या शाळेत शिकत होते. सात रुपये फी होती तीही देणे परवडत नव्हते. महिनाअखेरीस बाकावर उभे राहायचे किंवा वर्गाबाहेर जायचे. कधी कधी वेताच्या छड्या मिळायच्या.
 
==कमाईची सुरूवातसुरुवात==
त्या वयातच जॉनी लिव्हर यांना जबाबदारीची जाणीव झाली होती. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. त्यामुळे अर्थात रात्री घरी उशिरा पोचायचे. दुसऱ्या दिवशी शाळेत जायला उशीर होई. मग शिक्षक ओरडत. मग ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचा प्रयत्‍न करीत. वर्गात अभ्यासात यथातथाच होते. पण मनात आले तर काहीही करायचे. नेहमी पहिला येणाऱ्या मुलाने रुबाब दाखवला, तेव्हा जॉनीने त्याला पुढच्या सहामाहीत भरपूर अभ्यास करून वर्गात दुसरा येऊन दाखवले.
 
ओळ ६३:
तसे जॉनी लिव्हरचे सर्वच शोज गाजत, पण त्यांच्या खास आठवणीतले दोन शोज म्हणजे मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमला झालेला होप-८६ हा आणि न्यू जर्सीतला शो. होप-८६मध्ये [[कल्याणजी आनंदजी]], [[लक्ष्मीकांत प्यारेलाल]] आणि [[आर.डी. बर्मन]] सहभागी झाले होते. ’नुक्कड’,”ये जो जिंदगी है’ या मालिकांतल्या कलाकारांची दोन आणि तिसऱ्या कोणाचे एक अशी तीन स्किट्स होती. जॉनीचा वापीला कार्यक्रम होता, पण तो न करताच तो ब्रेबॉर्न स्टेडियमला आला. स्वयंसेवकाचा बिल्ला लावून इकडे तिकडे फिरत असताना त्याला संयोजकांपैकी कुणीतरी पाहिले आणि स्टेजवर आमंत्रित केले. आनंदजींनी परवानगी दिल्यावर जॉनीने स्टेजवर जाऊन त्याला सुचेल ते केले. समोर दिलीप कुमारपासून ते अमिताभ बच्चनपर्यंतची फिल्म इंडस्ट्री बसली होती. सार्य़ंनी तो कार्यक्रम डोक्यावर घेतला. दुसरे दिवशी वर्तमानपत्रांत अमिताभ बच्चन आणि जॉनी लिव्हर यांच्या बातम्या झळकल्या.
 
न्यू जर्सीला असाच कार्यक्रम होता. ५०,००० लोक जमलेले. पुन्हा सारी फिल्म इंडस्ट्री हजर होती. आता नवे काय करू या विचारात असताना त्या वेळी जगभरात लोकप्रिय असणारे मायकेल जॅक्सन, अपाची इंडियन, टीना टर्नर आणि हॅमर यांच्या गायन-नृत्याच्या शैलीची आपण मिमिक्री करू या असा विचार जॉनीच्या डोक्यात आला. एका म्युझिशियनला बोलावून आपल्याला हव्या असलेल्या अपेक्षा सांगितल्या आणि या सर्वांना एकत्र आणेल अशा प्रकारचे संगीत वाजवायला सांगितले. या संगीतावर जॉनीने जो कार्यक्रम केला तो तुफान गाजला. लोकांनी अक्षरश:अक्षरशः उभे राहून कौतुक केले.
 
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते|लिव्हर, जॉनी]]