"गर्भाधान संस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १०१:
 
=== १ ई ४. संभोगविधी ===
रात्री स्त्रीने श्वेतवस्त्र परिधान करावे. निजण्याच्या खोलीतील मखरात पुष्पाची शेज केलेल्या पलंगावर उभयतांनी बसून विडे खाऊन स्त्रीने आडवे पडावे. पुरुषाने तिच्या नाभीप्रदेशी हात ठेऊनठेवून (उपस्थस्पर्श) मंत्र म्हणून गर्भाधानविधीस प्रारंभ करावा. मंत्राचा अर्थ असा आहे : ‘गर्भधारणार्थ तुझ्या योनीला समर्थ करून, ईश्वर तुझ्या ठायी गर्भधारणा करो. गर्भाची वृद्धी सुखपूर्वक होवो आणि दहा (चांद्र) मासांचे पूर्वी तो पतन न होवो, अशी ईश्वर कृपा करो.’ यानंतर तीन बोटांनी उपस्थास (योनीस) स्पर्श करावा. नंतर स्त्रीसह संभोग करावा आणि ‘तुझ्या प्राणात (बीजात) रेत धारण करतो’, असे म्हणावे. नंतर मंत्र म्हणावा.
 
त्या मंत्राचा अर्थ असा आहे : ‘जशी पृथ्वी ही अग्नीने गर्भवती आहे, जशी याही इंद्राच्या योगाने गर्भवती आहे, जसा वायू हा दिशांचा गर्भ आहे, अशा रीतीने मी तुला गर्भधारणा करवितो.’ शेवटी स्त्रीच्या हृदयास स्पर्श करून आचमन करावे, म्हणजे हा विधी पुरा झाला. हृदयास स्पर्श करणे हे स्नेह आणि प्रेम यांचे प्रतीक आहे. 
ओळ १०८:
‘रजोदर्शनासाठी अशुभ काळ आला असता मोठा दोष होतो. या दोषनिवारणासाठी ‘ऋतूशांती’ नावाचा विधी करावा लागतो. (या विधीला ‘भुवनेश्वरी शांती’ असे म्हणतात.) अशुभ असणारी [[नक्षत्रे]] पुढीलप्रमाणे आहेत – भरणी, कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा आणि ज्येष्ठा. अशुभ असणारे योग याप्रमाणे – विष्कंभ, गंड, अतीगंड, शूल, व्याघात, वङ्का, परीघ, व्यतीपात, वैधृती आणि भद्रा. याचप्रमाणे पुढील कालावधीही अशुभ मानलेला आहे – ग्रहणकाल, मध्यरात्र, संधीकाल, अपराह्णकाल आणि निद्राकाल.
 
गर्भाधानापूर्वी करावयाच्या शांतीचा संक्षिप्तरूपाने विधी असा – प्रथम भुवनेश्वरी शांतीचा संकल्प करावा. श्री [[गणपती|गणपति]]पूजन, वरुणपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन आणि नांदीश्राद्ध करावे. नंतर पंचगव्यमेलन करून स्थळाची शुद्धी करावी. तीन कलश एका ओळीत ठेऊनठेवून मध्यभागी असलेल्या कलशावर श्री भुवनेश्वरीदेवी या मुख्य देवतेची प्रतिमा स्थापन करावी आणि तिची षोडषोपचारे पूजा करावी. श्री भुवनेश्वरीदेवीच्या उजव्या अंगाला असलेल्या कलशावर इंद्राणी आणि डाव्या कलशावर [[इंद्र]] या देवतांची स्थापना करून त्यांचे पूजन करावे. त्यानंतर यज्ञकुंडात अग्नीची स्थापना करावी. नंतर इंद्राणी देवतेच्या कडेला नवग्रहमंडल स्थापन करून त्यांची पूजा करावी. नंतर यज्ञकुंडाकडे बसून पुढीलप्रमाणे अन्वाधान (आहुत्यांची संख्या निश्चित करणे) करावे. नवग्रहांसाठी अनुक्रमे रूई, पळस, खैर, आघाडा, पिंपळ, औदुंबर, शमी, दूर्वा आणि दर्भ या समिधांनी, तसेच चरु आणि आज्य यांनी २८ वेळा मंत्रांनी हवन करावे. तसेच भुवनेश्वरीसाठी दूर्वा, तीळमिश्रित गहू, पायस आणि तूप यांनी १००८ वेळा मंत्राने हवन करावे. नंतर इंद्र आणि इंद्राणी यांसाठी प्रत्येकी १०८ वेळा हवन करावे. हे शक्य नसल्यास श्री भुवनेश्वरीदेवीसाठी १०८ किंवा २८ आणि इंद्र-इंद्राणी यांसाठी २८ किंवा ८ वेळा हवन करावे. या वेळी वापरण्यात येणारे पायस होमावरच बनवलेले असावे; घरात केलेले नसावे. नंतर स्विष्टकृत् इत्यादी होमकर्म करून बलीदान, यजमान अभिषेक, विभूतीग्रहण आणि श्रेयोदान करावे.’ गर्भाधानसंस्कार प्रत्येक गर्भधारणेत पुन्हा करण्याची आवश्यकता नसते. 
 
=== १ ऊ. अष्टमांगल्य (आठांगुळे) ===