"कुंति" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ३:
'''कुंति''' (देवनागरी लेखनभेद : '''कुंती''') ही [[महाभारत|महाभारतातील]] [[हस्तिनापुर|हस्तिनापुराच्या]] [[पंडु|पंडु राजाची]] पत्नी व [[पांडव|पांडवांमधील]] थोरल्या तिघांची आई होती. [[यादव|यादव कुळातील]] [[शूरसेन|शूरसेनाची]] कन्या असलेल्या कुंतीचे बालपणीचे नाव ''पृथा'' असे होते. नि:संतान असलेल्या [[कुंतिभोज]] राजाला दत्तक गेल्यावर तिचे नाव ''कुंति'' असे ठेवण्यात आले.
 
कुंतिच्या सेवेवर प्रसन्न होऊन [[दुर्वास ऋषि|दुर्वास ऋषिंनी]] तिला एका मंत्राचे वरदान दिले. त्या मंत्राचा वापर करताच ज्या दैवताचे स्मरण ती करेल, त्या देवाकडून तिला पुत्रप्राप्ती होणार होती. कुमारी असलेल्या कुंतीने [[सूर्य|सूर्याचे]] स्मरण करून मंत्रोच्चार केला आणि मंत्राच्या प्रभावाने पुत्रप्राप्ती झाली. ह्या सुर्यपुत्राला जन्मतः अंगावर अभेद्य [[कवच]] आणि कानात [[कुंडले]] होती. या पुत्राचे नाव कुंतिने [[कर्ण_(महाभारत)|कर्ण]] असे ठेवले. परंतु अविवाहीत असताना या पुत्राला जवळ ठेवणे तिला शक्य नव्हते म्हणून कुंति एका पेटीत विपुल धन ठेऊनठेवून त्यामधे या पुत्राला ठेवते व ती पेटी नदीत सोडून देते. ही पेटी अधिरथ नावाच्या कौरवांच्या [[सारथी|सूताला]] सापडते. तो या पुत्राला आपल्याच पोटच्या मुलाप्रमाणे वाढवतो.
 
पुढे कुंतिचा विवाह [[हस्तिनापुर|हस्तिनापूरचा]] राजा [[पांडु|पांडुशी]] याच्याशी होतो. तिला [[माद्री|माद्री]] नावाची सवत देखील होती. एकदा पांडू मृगया करताना चुकून [[किंदम_ऋषी|किंदम ऋषी]] पति-पत्नीस हरीणांची जोडी समजून बाण मारतो. मरण्यापूर्वी किंदम ऋषी पांडूला शाप देतात की जेव्हा तो एखाद्या स्त्रीजवळ शरिरसुखाच्या अपेक्षेने जाईल, तेव्हा त्याला तात्काळ मृत्यू येईल. यानंतर विफल होऊन, राज्यत्याग करून पांडू आपल्या दोन्ही पत्नींसह वनवासात राहू लागतो. पुत्रप्राप्तीचा मार्ग खुंटल्याने पांडू कुंति व माद्रीला [[नियोग|नियोग]] पद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेण्यास सांगतो. तेव्हा कुंतिने तिच्याकडे असलेल्या मंत्राच्या सामर्थ्याबद्दल पांडूला सांगते. पांडूने त्या मंत्राद्वारे पुत्रप्राप्ती करून घेण्यास सहमती दर्शवतो. त्याबरोबर कुंति [[यमधर्म|यमापासून]] [[युधिष्ठिर|युधिष्ठीर]], [[वायू|वायूपासून]] [[भीम|भीम]] आणि [[इंद्र|इंद्रापासून]] [[अर्जुन|अर्जुन]] असे तीन पुत्र प्राप्त करून घेते. आपली सवत माद्री हिलादेखील माता होण्याचा अधिकार मिळावा म्हणून कुंति आपला मंत्र तिला देऊन टाकते. नंतर माद्री त्या मंत्रसामर्थ्याने [[अश्विनीकुमार|अश्विनीकुमारांपासून]] [[नकुल|नकुल]] आणि [[सहदेव|सहदेव]] हे जुळे पुत्र प्राप्त करून घेते. पांडू राजाच्या या पाच पुत्रांनाच [[पांडव|पांडव]] असे म्हणतात. कुंति माद्रीच्या मुलांनाही आपल्या पोटच्या मुलांप्रमाणेच वागणूक देते.
"https://mr.wikipedia.org/wiki/कुंति" पासून हुडकले