"अब्दुल करीम खाँ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन सदस्य:Usernamekiran/typos व तांत्रिक बदल
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४६:
 
==सांगीतिक कारकीर्द==
सुरूवातीच्यासुरुवातीच्या काळात अब्दुल करीम खॉं साहेब आपले बंधू [[अब्दुल हक]] यांचेबरोबर गात असत. [[बडोदा]] संस्थानाचे राजे या बंधूंच्या गायकीवर खुश झाले व त्यांनी दोन्ही बंधूंची दरबारात गायक म्हणून नियुक्ती केली.
 
अब्दुल करीम खॉं साहेबांना [[म्हैसूर]] राज दरबारात गायनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्यांची गाठ [[कर्नाटकी संगीत|कर्नाटकी संगीतातील]] अनेक सुप्रसिद्ध गायक प्रभृतींशी(??) पडली. त्यांच्या गायनाचा प्रभाव अब्दुल करीम खॉं साहेबांच्या गायकीवरही पडला. त्यांनी कर्नाटकी संगीताचा कसून अभ्यास केला. कर्नाटकी संगीतातील अनेक वैशिष्ट्ये त्यांच्या गायकीतही दिसून येत असत. ते फक्त उत्तर भारतातच नव्हे तर दक्षिण भारतातही आपल्या गाण्यासाठी लोकप्रिय होते. दक्षिण भारतात त्यांना अनेक ठिकाणांहून गाण्याचे कार्यक्रम करण्यासाठी खास बोलाविले जाई. त्यांनी दाक्षिणात्य कवी [[त्यागराज]] यांच्या कृतीही ध्वनिमुद्रित केल्या आहेत.. अनेकदा लोक तिथे त्यांच्या गळ्यात मोठमोठे हार घालून त्यांचे स्वागत करण्याबरोबर त्यांची मिरवणूकही काढत असत. खॉं साहेब वैयक्तिक आयुष्यात मात्र अतिशय साधे होते. म्हैसूर राजदरबारी ते नित्य नियमाने हजेरी लावत असत. त्यांना तिथे 'संगीत रत्‍न' उपाधी देऊन गौरविण्यात आले. म्हैसूरच्या वाटेवर ते [[धारवाड]]ला आपल्या भावाकडे मुक्काम करत असत. तिथेच त्यांनी आपले ख्यातनाम शिष्य [[सवाई गंधर्व]] यांना गाणे शिकविले. इ.स. १९०० मध्ये आठ महिने त्यांनी सूरश्री [[केसरबाई केरकर]] यांनाही गाणे शिकविले. पुढे केसरबाईंनी गायन क्षेत्रात खूप नाव कमावले.