"अजित कडकडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ४९:
वयाच्या आठव्या वर्षी अजित कडकडेंची त्यांच्या आई वडिलांनी नरसोबाची वाडी इथे मुंज केली. यावेळी कृष्णा नदीच्या पात्रात उतरलेला तो आठ वर्षांचा मुलगा पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून जाऊ लागला. त्याला पाहणाऱ्या तिथल्या लोकांनी आरडाओरडा केला. वडील पट्टीचे पोहणारे असल्याने त्यांनी स्थानिकांच्या मदतीने महत्प्रयासाने अजित कडकडेंना पाण्याबाहेर काढले. अशा प्रकारे श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी इथे अजित कडकडेंचा वयाच्या आठव्या वर्षी एका अर्थाने पुनर्जन्मच झाला असे म्हणावयास हवे.
 
आपल्या वडिलांचा आग्रह म्हणून त्यांनी गोव्यातील माडये गुरूजींकडे गाणं शिकण्यास सुरूवातसुरुवात केली. खरंतर तेव्हा अजितजींची गाणं शिकायची इच्छा नव्हती, त्यांच्या मूळ आवडीनिवडी वेगळ्या असल्याने त्यांचं मन संगीत शिक्षणात रमेना. अशातच एकदा गाण्याची परीक्षा असताना घरातून "परीक्षेला जातो" असं सांगून बाहेर पडलेला अजित मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला. मनसोक्त खेळून घरी आल्यावर बघतो तर काय, त्याचे संगीत शिक्षक माडये गुरूजी त्याच्या आधीच घरी हजर !! आज आपली करामत घरी कळली असणार असं लक्षात आल्याने वडिलांचा ओरडा खाण्याची शक्य तेवढी मानसिक तयारी करूनच अजितने घरात पाऊल टाकले. परीक्षेलाही न बसण्याइतकी गाण्याप्रतीची नावड पाहून अजितच्या वडिलांनी आपल्या मुलाला गाणं शिकवण्याचा विचारच सोडून दिला..
 
== '''डिचोली गावात पं.जितेंद्र अभिषेकी बुवांची मैफिल''' ==
ओळ ११८:
१९८५ पूर्वी अशोकजी पत्कींनी संगीतबद्ध केलेली विविध भावगीतं, तसंच शास्त्रीय संगीत आणि नाट्यगीतं, अभंग, भक्तिगीतं अजितजी गात होतेच. पण सर्वार्थाने त्यांचा स्वतःचा असा स्वतंत्र चेहरा असलेल्या अजरामर कलाकृतीने जन्म घेतला नव्हता. टेपरेकॉर्डर आणि कॅसेटचा जमाना तो. त्या जमान्यात सर्वसामान्य लोकांच्या अगदी मनामनांत आणि प्रत्येक घराघरांत पोहोचण्यासाठी एक जबरदस्त सांगीतिक अविष्कार कॅसेट्च्या माध्यमातून निर्माण होऊन तो सर्वसामान्य लोकांच्या हाती पडण्याची नितांत आवश्यकता होती. आणि ती पूर्ण केली 'देवाचिये द्वारी' या अल्बमने.
 
'देवाचिये द्वारी' या अल्बममधील एकूण आठपैकी सहा अभंग प्रभाकरजी पंडित यांनी संगीतबद्ध केलेले आहेत, तर दोन अभंग ('''"आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा"''' आणि '''"अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचे आता"''') हे प्रभाकरजींचेच सुपुत्र केदारजी पंडित यांनी संगीतबद्ध केले आहेत. '''"देवाचिये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी साधियेल्या"''' या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाने या कॅसेटची सुरूवातसुरुवात होते. प्रत्येक अभंगाच्या सुरूवातीलासुरुवातीला मिनिटभर श्री. वसंत बापट यांचे प्रास्ताविक निरूपणही आहे. जे आपल्याला त्या अभंगातील भावार्थाचा थोडक्यात परिचय करून देतं.
 
'देवाचिये द्वारी' हा पहिलाच अल्बम अमाप लोकप्रिय झाल्यानंतर जवळपास वर्षभरातच १९८६ साली अजितजींचे अजून दोन स्वतंत्र अल्बम आले. त्यातला एक म्हणजे '''<nowiki/>'भक्ती समर्पण'''' जो ११ मार्च १९८६ साली रिलीज झाला. या अल्बममध्ये अजितजींनी वेगळ्या ढंगाची श्रीकृष्णाची भजनं गायली आहेत. '''"भ्रमर चित्त हे पुन्हा विचारी", "गोकुळात मनमोहन दिसला", "कसा कळेना तुला विसरलो कुणी साथीला दावा नंदलाला घुमव कृपेचा पावा", "तुजविण कोण हरि मज तारी"''' अशी एकापेक्षा एक सुंदर ठायलयीत गायलेली भजनं यात आहेत जी अजितजींनी गायली आहेत. या संपूर्ण अल्बमला संगीतबद्ध केलंय '''केदार प्रभाकर पंडित''' यांनी.