"सर्वेपल्ली राधाकृष्णन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ ७९:
ज्या देशामध्ये शिक्षकाला सर्वत्र मान व प्रतिष्टा असते तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देश सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे.
 
एक कुलगुरू हा गुरुकुलाचागुरूकुलाचा आद्य आचार्य असावयास हवा. ज्ञानाने, तापाने, चारित्राने तो सगळ्यांच्या अग्रस्थानी असावा. हे वाक्य कुलगुरू, प्राध्यापक, आणि एक शिक्षक म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पूर्णतः लागू होते. एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असावा असे त्यांचे मत होते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता.
 
संस्कृत भाषेचा अभ्यास करून त्यांनी प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. पश्चिमेकडचे तत्त्वज्ञानातील प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले यांच्यासारख्या तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केला. त्याचप्रमाणे इंग्रजी साहित्यातील शेक्सपिअर, कोलारीज, ब्राउनिंग, वॊल्ट विटमन इत्यादी साहित्यिकांच्या लेखन शैलीचा त्यांनी अभ्यास केला. तसेच गटे, डानटे, होमर यांसारख्या महाकवींची काव्यसृष्टी अनुभवली. त्यामुळे एक परिपूर्ण शिक्षक म्हणून संपूर्ण जगाने डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा गौरव केला.