"महापरिनिर्वाण दिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ २:
[[File:Dr. Bhimrao Ambedkar.jpg|thumb|right|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]]]
 
'''महापरिनिर्वाण दिन''' किंवा '''महापरिनिर्वाण दिवस''' हा [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा स्मृतिदिन असून तो [[६ डिसेंबर]] रोजी आयोजित केला जातो.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.hindikiduniya.com/events/dr-ambedkar-mahaparinirvan-diwas/amp/|title=डॉ अम्बेडकर महापरिनिर्वाण दिवस 2018 - Ambedkar Mahaparinirvan Diwas in Hindi|date=2017-01-24|work=हिन्दीकीदुनिया.com|access-date=2018-05-09|language=en-US}}</ref><ref>https://scroll.in/announcements/945972/mahaparinirvan-diwas-why-is-it-celebrated-on-6th-december</ref> आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील [[चैत्यभूमी]] येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक '[[बोधिसत्व]]' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरुगुरू होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी '[[निर्वाण|महापरिनिर्वाण]]' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून [[मुंबई]]तील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या [[चैत्यभूमी]] येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील [[आंबेडकरवाद]]ी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेऊन त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध [[विहार]]े ([[बौद्ध मंदिर]]े), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात.<ref name="auto">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://navbharattimes.indiatimes.com/education/gk-update/dr-ambedkar-mahaparinirvan-divas-today-know-important-facts/articleshow/72394992.cms|title=Mahaparinirvan Din: डा. आंबेडकर का महापरिनिर्वाण दिवस आज, जानें काम की बातें - dr ambedkar mahaparinirvan divas today know important facts|website=Navbharat Times}}</ref><ref name="auto1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.freepressjournal.in/india/what-is-mahaparinirvan-divas-all-you-need-to-know-why-br-ambedkar-is-linked-to-it|title=What is Mahaparinirvan Divas? All you need to know why BR Ambedkar is linked to it|website=Latest Indian news, Top Breaking headlines, Today Headlines, Top Stories at Free Press Journal}}</ref><ref name="auto2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiacelebrating.com/events/dr-ambedkar-mahaparinirvan-diwas/|title=Dr. Ambedkar Mahaparinirvan Diwas (64th) - 6th December 2019|date=23 डिसें, 2016|website=IndiaCelebrating.com}}</ref>
 
पूर्वी [[महाराष्ट्र]] व [[उत्तर प्रदेश]] राज्यांमध्ये महापरिनिर्वाण दिनाची सार्वजनिक सुट्टी राहत असे.