"गोविंदप्रभू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १८:
यामुळे शिक्षण, संरक्षण, सेवा आणि दास्य हे व्यवसायाचे चार घटक तयार झाले. अशा विभागणीनुसार वरच्या गटाची सत्ता छोट्या गटावर राहत गेली. प्रस्थापित समाज व्यवस्था इतकी बिघडली असताना परिवर्तनवादी विचारांचा एक नवीन वर्ग निर्माण होत गेला.परंतु ठिकठिकाणी हा परिवर्तनवादी विचार खोडण्याचा जबरदस्त प्रयत्न झाला आहे.
परिवर्तनवादी विचार बिघडत चाललेल्या समाजाला प्रत्येक वेळी दिशा देण्याचा प्रयत्न करत असतो. पण या मध्ये प्रस्थापितांची दुकाने बंद होतील या पोटी प्रस्थापित विरुद्ध परिवर्तन हा संघर्ष कित्येक काळ या समाजात चालत आलेला आहे. परंतु ठोक मुद्दे नसल्यास परिवर्तन हेही अधुर रहात आणि त्याला गळती सुरू होते. अकरावे आणि बारावे शतक हे महाराष्ट्राच्या इतिहासातला एक परिवर्तनाचा काळ होता. वऱ्हाड प्रांतात एक ईश्वर पुरुष जन्माला आले ते म्हणजे गोविंदप्रभु होय. त्यांनी सतत १२५ वर्ष आपले आयुष्य समाज परिवर्तनासाठी खर्च केले आहे.
श्रीगोविंदप्रभू फार तरुण अवस्थेत असताना त्यांना यात्रेकरूंच्या मेळाव्यात सहभागी होणे आवडायचे. एके वेळी ते द्वारकेला गेले. तेथ श्रीचक्रपाणी राउळांशी त्यांची भेट झाली. त्यांच्याकडून श्रीप्रभूनी संन्यास घेतला व समाजकार्याची दीक्षा घेतली. आपल्या गुरुसारखेगुरूसारखे आपणही दिनदुबळ्यांची सेवा करावी समाजातील भेदाभेदाची घाण नष्ट करून माणसाची मने निर्मळ पाण्यासारखी बनवावी हाच संकल्प करून त्यांनी तो प्रत्यक्षात उतरविला. त्याकाळी अस्पृश्यता फार मोठ्या प्रमाणात होती. या अस्पृश्यतेला गोविंद प्रभुनी वाचा फोडली.
तात्कालीन धार्मिक परिस्थिती फार कठीण होती. हेमाद्री पंडिताच्या चतुर्वग चिंतामणी या ग्रंथाचा प्रचंड प्रभाव सामान्य जनतेवर पडलेला आहे. त्याकाळी महार, मातंग, चांभार या घटकांना समाजाने वाळीत टाकले होते. त्यांची घरे गावच्या एका बाजूला स्थलांतरित करण्यात आली. त्यावेळी गोविंदप्रभु त्यांच्या घरी जाऊ लागले. त्यांच्या मुलांशी खेळू लागले. त्यांच्या मुलांच्या ताटातील अन्न प्रेमाने खाऊ लागले. लगेच गावच्या महाजनामध्ये यासंबंधी चर्चा होऊ लागली. "राउळ मातांगा महाराचां घरोघरीं विचरताति : आणि तैसेचि दीक्षिता ।
ब्राह्मणाचां घरी विचरताति" असे उद्गार त्या मंडळींकडून येऊ लागले. श्रीगोविंदप्रभू मातंग महारादी शुद्रांच्या घरी जातात. हा परिवर्तनवादी बदल गावातील महाजनांना पाहवत नव्हता. म्हणून बऱ्याच लोकांनी त्यांच्यावर आरोप केले. परंतु गोविंदप्रभु डगमगले नाही.चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट मोडून महार मतांगच्या घरी जाणे, खाद्यपदार्थ खाणे हा परिवर्तनवादी विचार महाजनांना रुचला नाही.