"गोंदिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
ओळ १२१:
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे शहरात पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही. शहराची वाडती लोकसंख्या लक्षात घेऊन विभिन्न ठिकाणी पाण्याच्या ४ टाक्या निर्माण करण्याचे काम चालू आहे. गोंदियाला सध्या(इ.स.२०१२) विजेच्या भारनियमनातून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव कमी झाला आहे.
 
गोंदियात दिवाळी, होळी, दसरा हे सण जल्लोषात साजरे केले जातात. गणेशोत्सव व दुर्गापूजा हे सण अनेक दिवस चालतात. त्यातल्या त्यात दुर्गापूजेच्यावेळी तयार करण्यात येणारे देखावे बघण्यासारखे असतात. ईद, गुरुनानकगुरूनानक जयंती, महावीर जयंती व मोहर्रम हे सणदेखील साजरे होतात. 'मारबत व बडग्या' या मिरवणूक प्रकार गोंदियात होतो. पोळा व तान्हा पोळा हे सण उत्साहात होतात. एकेकाळी पतंग उडवण्याचा शौक सामूहिकपणे सध्याच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर साजरा व्हायचा. स्टेडियम उभारणीच्या पूर्वी या पटांगणावर चटईच्या पत्र्यांचा आडोसा लावून फुटबॉल व हॉकीचे राज्यस्तरीय सामने खेळले जायचे. मात्र, त्यांना आता स्टेडियम असूनही ग्रहण लागले आहे.
 
नेहरू चौकाजवळील कार्नरवर दर रविवारी होणाऱ्या देशी कुस्तीच्या दंगलीने शहरातील बरेच पहेलवान घडवले. शहरातील एकमात्र प्रसिद्ध बापूजी व्यायाम शाळा तिची ओळख जपण्याकरिता धडपडत आहे. त्याची जागा आता स्टेपअप जिम, गोल्डन जिम, अशा आधुनिक साहित्यांनी सुसज्ज जिमने घेतलेली आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/गोंदिया" पासून हुडकले